या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या या भरती मोहिमेचे उद्दिष्ट DRDO, DST, ADA आणि CME विभागांमध्ये वैज्ञानिक ‘बी’ (Scientist B) च्या एकूण २०४ रिक्त जागा भरण्याचे आहे.
(वाचा : BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात १०५ पदांसाठी भरती सुरु; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी)
पदभरतीचा तपशील :
वैज्ञानिक ‘बी’ (Scientist B) पदभरती अंतर्गत एकूण पदांची संख्या – २०४
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) : एकूण १८१ रिक्त जागा
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) : एकूण ११ जागा
- एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) : एकूण ०६ जागा
- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) : एकूण ०६ रिक्त जागा
विभागनिहाय पदांची संख्या :
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – एकूण ५२ जागा
- मेकॅनिकल इंजिनीअरिंग – एकूण ५० जागा
- कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – एकूण ३९ जागा
- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – एकूण ०६ जागा
- मटेरियल सायन्स/मेटलर्जिकल इंजिनीअरिंग – एकूण १२ जागा
- फिजिक्स – एकूण १० जागा
- केमिस्ट्री – एकूण ०५ जागा
- केमिकल इंजिनीअरिंग – एकूण १३ जागा
- एरोनॉटिकल इंजिनीअरिंग – एकूण ०७ जागा
- मॅथेमॅटिक्स – ०२ जागा
- सिविल इंजिनीअरिंग – ०२
- एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनीअरिंग – ०२ जागा (रद्द अथवा बदल होण्याची शक्यता)
- जिऑलॉजी अँड जिओफिजिक्स – ०२ जागा
- पेट्रोलियम इंजिनीअरिंग – ०१ जागा
- प्रोडक्शन अँड इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग – ०१ जागा
(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; परीक्षेच्या तारखा जाहीर)
अर्जाची माहिती :
० डीआरडीओमधील वरील सर्व भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.
० या भरतीसाठी ऑनलाइन अर्जांना सुरुवात झाली असून, ३१ ऑगस्ट २०२३ हि अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
० जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागतील.
० अन्य सर्वांसाठी अर्जप्रक्रिया विनामूल्य आहे.
० उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात.
आवश्यक पात्रता :
- संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- काही पदांसाठी गेट स्कोअरही (GATE) मागितला गेला आहे.
- या DRDO रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ मे २०२३ रोजी ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे.)
टीप : अधिसूचनेमध्ये सविस्तर माहिती वाचू शकता.
डीआरडीओ वैज्ञानिक भरती २०२३ च्या अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.undefined
DRDO scientist B vacancy 2023 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
डीआरडीओ वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : SWAYAM Portal Courses : ‘स्वयम पोर्टल’वर करता येणार नववी ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम; जाणून घ्या कसे)