मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट सदस्याच्या दहा जागासाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये पाच खुल्या प्रवर्गातील आणि पाच राखीव जागांचा समावेश आहे. राखीव जागांमध्ये एक अनुसूचित जाती आणि एक विमुक्त जाती व भटक्या जमाती तर तीन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. तर २१ ऑगस्ट सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडेल. उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील करण्यास २३ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे. २५ ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १३ सप्टेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
(वाचा : Success Story : आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय काम; देशसेवेसाठी या अभिनेत्रीने सोडले मनोरंजनविश्व)
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक गाजली
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर शिक्षक मतदारांमधून एकूण १० प्रतिनिधी निवडून देण्यासाठी झालेल्या निवडणुकीत ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू) ला आठ जागांवर यश मिळाले आहे. तर, एका जागेवर ‘मुक्ता’ संघटनेला एक आणि ‘मस्ट’ या प्राध्यापक संघटनांना एका जागेवर समाधान मानावे लागले. बुक्टूने सिनेटच्या १० जागा तर विद्यापरिषदेच्या सहापैकी तीन जागा लढवल्या, त्यापैकी सिनेटच्या आठ तर विद्यापरिषदेच्या तीन जागा जिंकून बुक्टूने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.
कोण करू शकते मतदान…?
विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजांमधून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकी दरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात. मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे.
(वाचा : Acharya College Hijab Controversy: मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी…? काय आहे कॉलेजची भूमिका)