Vivo Y77t ची किंमत
Vivo Y77t स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे, जो लवकरच भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. कंपनीनं हा फोन दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये लाँच केला आहे. ह्याच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,३९९ चायनीज युआन म्हणजे सुमारे १६,००० रुपये आहे. तर १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५९९ चायनीज युआन म्हणजे सुमारे १८,२५० रुपये आहे. हा विवो फोन ब्लॅक, ब्लू आणि गोल्डन सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.
वाचा: iPhone 15 मध्ये 35W फास्ट चार्जसह type C पोर्टही असणार? समोर आली महत्त्वाची माहिती
Vivo Y77t चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y77t मध्ये फुल एचडी+ रिजॉल्यूशनसह ६.६४ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २४०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि पंच-होल डिजाइन मिळते. स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित ओरिजिन ओएस ३ वर चालतो.
स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७०२० प्रोसेसर आहे. जो ६नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. ह्यात २.२गिगाहर्ट्झ हाय क्लॉक स्पीड मिळतो. स्मार्टफोनमध्ये १२जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम + २५६जीबी यूएफएस २.२ स्टोरेज मिळते.
वाचा: SIM Card खरेदीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक; उल्लंघन केल्यास १० लाखांचा दंड
Vivo Y77t स्मार्टफोन एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यात ५० मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
हा फोन ५०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे, जी ४४वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. फोनमध्ये ड्युअल सिम ५जी, ४जी व्हीओएलटीई, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२, यूएसबी टाइप-सी, ३.५ मिमी ऑडियो जॅक आणि फिंगर प्रिंट सेन्सरची सुविधा आहे.