इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) झाल्यामुळे मुंबई हे शैक्षणिक आणि उद्योजकतेचे केंद्र बनण्यास सज्ज आहे, असे सांगत ऑलकार्गो ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष, NITIE बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले आहेत.
“IIM बनणे हा NITIE आणि मुंबईसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी NITIE प्रसिद्ध आहे. IIM कायदा २०१७ मध्ये NITIE चा समावेश केल्याने आम्हाला भावी पुढारी घडण्यासाठी सतत शिकण्याची आणि नवकल्पनाच्या संस्कृतीची जोपासना करून आमचा शैक्षणिक तेजाचा प्रवास सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल.” अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
(वाचा : Young Achievers Scholarship 2023: नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; असा करा अर्ज)
याप्रसंगी प्रा. NITIE चे संचालक मनोज तिवारी यांनी, “IIM कायदा, २०१७ मध्ये NITIE चा समावेश करणे हे आमचे प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापन सदस्य, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनत, प्रयत्नांचे यश आहे.”, असे मत व्यक्त केले आहे.
NITIE ने १९६३ मध्ये स्थापनेपासून जागतिक नेत्यांचा आणि व्यावसायिकांचा विकास करण्याचा वारसा तयार केला आहे. IIM मान्यता मिळवून त्याच्या प्रयत्नांना गती देण्याचा निर्धार केला आहे. NITIE ला २०२३ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे व्यवस्थापन श्रेणीमध्ये ७ वे स्थान मिळाले आहे. तिच्या प्रतिष्ठित युनिटसह, या संस्थेचे आता भारतातील पहिल्या तीन रँकिंगमध्ये येण्याचे उद्दिष्ट आहे.
(वाचा : Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल व वन विभाग तलाठी पदभरती; परीक्षेच्या तारखा जाहीर)