हायलाइट्स:
- पारनेरच्या तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपमुळं खळबळ
- ज्योती देवरे यांनी केले लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप
- आमदार नीलेश लंके यांनी दिलं देवरेंना उत्तर
अहमदनगर: पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आत्महत्येचा इशारा देण्याच्या ऑडिओ क्लिपवर पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवरे यांचे सर्व आरोप फेटाळून लावत देवरे यांचाच भ्रष्टाचार सिद्ध झाला असून चौकशी सुरू झाल्याने त्या हा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे. (NCP MLA Nilesh Lanke’s Reaction on Jyoti Deore’s Audio Clip)
वाचा: असं कसं झालं? भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत काँग्रेसचे आमदार
आमदार लंके यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील तहसीलदारांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यांनी त्यामध्ये केलेले आरोप खोटे आहेत. उलट स्वत:चा बचाव करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचे अनेक भ्रष्टाचार सिद्ध झाले आहेत. नाशिकचे विभागीय महसूल अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी त्यांची चौकशी करून सरकारकडे अहवालही पाठविला आहे. त्यामुळे तहसीलदार हे खोटे आरोप करीत आहेत. यापूर्वीही जेव्हा जेव्हा त्यांच्या गैरकारभाराची प्रकरण समोर आली, तेव्हाही त्यांनी असाच प्रकार केला आहे. अशाच पद्धतीच्या क्लिप व्हायरल केलेल्या आहेत.
वाचा: कोल्हापूर हादरले! स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा नरबळी?
प्रकरण समोर आल्यावर मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला रात्री अपरात्री मेसेज पाठवून आत्महत्या करण्याची धमकी दिलेली आहे. आताही त्या लोकप्रतिनिधींसह सर्वांनाच दोषी धरत आहेत. त्या ज्या महसूल विभागात काम करीत आहेत, त्यातील कोणावरच त्यांचा विश्वास दिसत नाही. त्यांचे एकट्याचेच काम संत महंतासारखे आहे काय? त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांची सखोल चौकशी होत आहे, त्यातून बचाव करण्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड सुरू आहे, असेही लंके यांनी म्हटले आहे.
वाचा: ‘महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय तिच्या म्हणण्याला किंमत येते कुठे?’