विचारसरणी बदलणारा तिलक
शिक्षण पूर्ण करून नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांची विचारसरणी बदलण्यास तिलक हा एक उत्तम उदाहरण ठरतोय. तुम्ही तुमच्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर यशस्वी होऊ शकता हे तिलकने त्याच्या वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी सिद्ध केले. २००६ मध्ये जन्मलेल्या तिलकने त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षी सुरू केलेल्या स्टार्टअप कंपनीची आज एकूण संपत्ती १०० कोटींहून अधिक आहे.
कोण आहेत तिलक मेहता?
१६ वर्षाचा तिलक मेहता भारतातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक आहे. २००६ मध्ये गुजरात राज्यात त्याचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षी, जिथे मुले खेळ, अभ्यास आणि टीव्ही पाहण्यात व्यस्त असतात, इतक्या लहान वयात त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. त्याने एकाच वेळी आपला अभ्यास आणि व्यवसाय सांभाळू शकतो हेही त्याने साध्य केले आहे.
तिलकचे वडील लॉजिस्टिक कंपनीत कार्यरत असून, आई काजल मेहता गृहिणी आहे. त्याला तन्वी मेहता ही जुळी बहीणही आहे. २०१८ मध्ये, त्याने इंडिया मेरिटाइम अवॉर्ड्समध्ये यंग बिझनेसमनचा किताब जिंकला आहे. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण करून, त्याच्या कंपनीला अधिक उंचीवर नेण्याचे त्याचे स्वप्न आहे.
अशी झाली Paper N Parcels ची सुरुवात…
तिलक एकदा त्याच्या नातेवाइकडे राहायला गेला असता तिथे तो त्याचे महत्त्वाचे पुस्तक विसरून आला. ते पुस्तक त्याला हवे असल्यामुळे त्याच्या वडिलांना पुस्तक मिळवण्यासाठी पायपीट करावी लागणार होती. शिवाय, त्या दिवशी त्याचे वडील कामत व्यस्त असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण पुढे ढकलले. वडिलांनी नकार दिल्यानंतर तिलकने कुरिअर कंपनीची मदत घेण्याचा विचार केला, परंतु कुरिअर कंपनी त्याच दिवशी डिलिव्हरी करण्यासाठी ३०० रुपये शुल्काची मागणी केली. त्यामुळे त्याच्या वडिलांनी याच रकमेतून नवीन पुस्तक खरेदी करण्याची सूचना केली.
गरज ही शोधाची जननी :
‘गरज ही शोधाची जननी असते’ असे म्हणतात, प्रत्येक यशस्वी उद्योजक छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या बाबतीतताही असेच काही घडले. आपल्यासारख्य अनेकांना अशी समस्येला सामोरे जावे लागत असेल असा विचार त्याच्या मनात आला. जर त्या लोकांनी कुरिअर कंपनीची मदत घेतली तर माल पोहोचवायला खूप वेळ लागतो आणि कमी वेळेत माल पोहोचवायचा म्हटलं तर जास्त पैसे घेतात. अशातच त्याला ‘पेपर्स एन पार्सल’ सुरू करण्याची कल्पना सुचली.
मुंबईच्या डबेवाल्यांसोबत टायअप :
अखेर कमी वेळेत आणि कमी पैशात लोकांना वस्तूंची डिलिव्हरी देऊ शकणारी स्टार्टअप कंपनीची सुरुवात त्याने केली. तो समस्या सोडवत होता आणि त्याचे कुटुंब देखील त्याला मदत करण्यास तयार होते परंतु तरीही त्याच्यासमोर आव्हान होती. डब्यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते कारण मुंबईत सर्वकाही उशिरा होऊ शकते पण हे लोक खूप वक्तशीर असतात आणि त्यांचे नेटवर्क संपूर्ण मुंबई शहरात पसरलेले असते.अखेर तिलकने डबेवाल्यांसोबत एकत्र काम करण्याचा विचार केला. तिलकने डब्बावाल्यांसोबत वेळ घालवला आणि त्यांचे नेटवर्क समजून घेतले आणि कामाला सुरुवात केली.
शंभर कोटींहून अधिक उलाढाल आणि ५०० हून अधिक लोकांना रोजगार :
तिलकने, घनश्याम पारेख यांना कंपनीचे सीईओ बनवले. सुरुवातीला त्याच्या कंपनीला बुटीक आणि स्टेशनरीच्या दुकानातून छोट्या ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. त्यासाठी त्याने मुंबईतील डब्बावाल्यांची मदत घेऊन पार्सल्स पोहोचवायला सुरुवात केली. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी आपले काम वाढवले.
तिलकची कंपनीत आज २०० हून अधिक लोक काम करतात आणि जवळपास ३०० डब्बेवाले तिलक आणि त्याच्या कंपनीशी जोडले गेले आहेत. कंपनीची प्रतिवर्ष १०० कोटींहून अधिकची उलाढाल होते. ही उलाढाल २०० कोटींहून अधिक व्हावी यासाठी तिलक कार्यरत आहे. आजच्या काळात सगळी मुलं खेळण्यात दिवस घालवतात तेव्हा टिळकांनी काहीतरी वेगळा विचार करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिलक मेहता बद्दल काही महत्त्वाची तथ्य :
तिलक मेहता यांनी आपल्या छोट्याशा समस्या सोडवण्याचा असा विचार केला की त्यांचे नाव आता जगभरात प्रसिद्ध झाले आहे. शिवाय, आजच्या काळातील सर्वात तरुण तरुण उद्योजकही तो बनला आहे.
- तिलकला प्रवासाची खूप आवड आहे.
- तिलकला क्रिकेट खेळायला आवडते.
- मुंबईतील डब्बावालांशी संगनमत करून त्याने आपले नेटवर्क तयार केले आहे.
- ज्या बँकरला त्याने आपली कल्पना विकली त्याला त्याने मुख्य कार्यकारी बनवले.
- त्यांच्या Papers N Parcels स्टार्टअपमध्ये मुंबईतील ५०० हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.