विशेष म्हणजे १९ हजार पदांपैकी १ हजारांहून अधिक पदे नाशिक नगर परिषदेमध्ये आहेत. त्यामुळे नाशिककरांसाठी ही सुवर्णसाठी आहे. एकूण १ हजार ३८ रिक्त पदे नाशिक परिषदेत भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असून त्यासाठीची नोंदणी सुरु झाली आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी २५ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.
परीक्षेच्या तारखा उमेदवारांना परिषदेच्या संकेतस्थळावरच कळतील आणि परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या ७ दिवस आधी मिळेल. तर ज्या उमेदवारांना नोकरी मिळेल त्यांना आपल्या प्राप्त पदानुसार १९,९०० ते १,१२,४०० इतके वेतन मंजूर झाले आहे.
(वाचा: Sub Inspector Recruitment 2023: कंबर कसा.. सब इन्स्पेक्टर पदासाठी सुरु झाली आहे महाभरती! असा करा अर्ज..)
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये भरती साठी रिक्त असलेली पदे आणि संख्या..
ग्रामसेवक (कंत्राटी) – ५०
आरोग्य पर्यवेक्षक – ३
आरोग्य परिचारिका – ५९७
आरोग्य सेवक (पुरुष) – ८५
आरोग्य सेवक (पुरुष – हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी – १२६
औषध निर्माण अधिकारी – २०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १४
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – २
विस्तार अधिकारी – शिक्षण (वर्ग ३, श्रेणी २) – ८
वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) – ३
पशुधन पर्यवेक्षक – २८
कनिष्ठ आरेखक – २
कनिष्ठ लेखा अधिकारी – १
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – ५
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – २२
मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका – ४
कनिष्ठ यांत्रिकी – १
कनिष्ठ अभियंता (स्थापत्थे) – ३४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ३३
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १
एकुण – १०३८
कसा करावा अर्ज
नाशिक जिल्हा परिषदेतील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर जावून अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, त्यानंतर अर्ज करता येईल. २५ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे.
(वाचा: ZP Recruitment 2023: महाभरती! राज्यातील 34 जिल्हा परिषदा आणि १९ हजार जागा.. असा करा अर्ज..)