‘बीएफएसआय’ मध्ये महाभरती! ५० हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या..

तुम्ही जर बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधील असाल तर येता काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. कारण लवकरच ‘बीएफएसआय’ म्हणजे बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) सेक्टर मध्ये महाभरती होणार आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक जागांची भरती या क्षेत्रात होणार असून नोकरदारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे.

मागील काळात म्हणजे विशेषकरून कोविड नंतर बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये काहीशी नोकऱ्यामध्ये कपात पाहायला मिळाली. मंदी सदृश हा काळ होता. पण आता आर्थिक घडी पुन्हा सुरळीत होत असल्याने या सेक्टरमध्ये महाभरती होणार आहे. खासकरून येत्या सणांच्या मुहूर्तावरच ही भरती होणार आहे.

क्रेडिट कार्ड सेल, पर्सनल फायनान्स, रिटेल इन्शुरन्स विक्री, वैयक्तिक वित्त, बँकिंगमधील विमा, वित्तीय सेवा आणि विमा यामध्ये वाढ झाल्याने बीएफएसआय क्षेत्रात सध्या तेजी आहे. म्हणून या क्षेत्रात येत्या काळात भरगोस नोकऱ्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात ‘टीमलीज’ ने एक अहवाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये २०२३ च्या अखेरीस जवळपास ५० हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे म्हटले आहे.

कोविडनंतर बराच काळ लोकांच्या मनात भीती होती. त्यामुळे खर्च करण्याच्यी मानसिकता कमी झाली होती. पण आता लोक खर्च करत आहेत. शिवाय सणासुदीचे दिवस जवळ आल्याने लोकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याने २०२३ मध्ये साधारण दिवाळीच्या आधी बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहे.

(वाचा: Career Change Tips: नोकरी सोडताय? मग आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर…)

‘येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये किंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. याची सुरूवात झाली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये अंदाजे २५ हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर येत्या काळात अजून २५ हजार नोकरदारांना या क्षेत्रात रोजगार मिळेल.’ असे टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितले आहे.

सणाचे निमित्त..

भारतामध्ये पहिल्या सहा महिन्यानंतर सणासुदीचा काळ सुरु होतो. त्यामुळे खरेदी विक्री पासून, क्रेडिट कार्ड, बँकिंग या क्षेत्रात प्रचंड मोठी उलाढाल असते. परिणामी या काळात बीएएसआय क्षेत्रात तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी नेहमीच मोठी असते. त्यातही अहमदाबाद, पुणे, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर या शहरांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी असतात. विशेषकरून ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांत चलती असते. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची मागणी देखील वाढलेली असते. यंदाही असाच काहीसा कल असेल.

पगारातही वाढ..

बीएफएसआय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ७ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘टीमलीज’च्या अहवालानुसार, ऑन-दि-फीट रोलसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये २० ते २२ हजार रुपये पगार दिला जात आहे. तर कोलकातामध्ये १६ ते १८ हजार रुपये आणि चेन्नईमध्ये १८ ते २० हजार रुपये वेतन दिले जात आहे.

(वाचा: Competitive Exam Tips: स्पर्धा परीक्षा देताय? मग सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून करा ‘या’ गोष्टी..)

Source link

banking jobs in indiabanking recruitmentbanking sectorbfsiCareer NewsCareer News In Marathifinance sectorjob in bankJob Newsjob news in marathi
Comments (0)
Add Comment