raj thackeray on pune tour: राज ठाकरे पुढील महिन्यात पुन्हा पुणे दौऱ्यावर, मेळाव्याचे करणार आयोजन

हायलाइट्स:

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुढील महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
  • सप्टेंबर महिन्याच्या ३, ४ आणि ५ तारखेला ते पुण्यात असणार आहेत.
  • या तीन दिवसांच्या काळात ते मनसे शाखाअध्यक्षांचा मेळावा घेणार आहेत.

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले संपूर्ण लक्ष पुण्यावर केंद्रित केलेले दिसत आहे. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल करत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे राज ठाकरे पुन्हा एकदा पुढील महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या ३, ४ आणि ५ तारखेला ते पुण्यात असणार आहेत. या तीन दिवसांच्या काळात ते मनसे शाखाअध्यक्षांचा मेळावा घेणार आहेत. mns chief raj thackeray is going to tour pune again next month

मनसे शाखा अध्यक्षांच्या मेळाव्याबरोबरच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस दिली जाणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- डॉ. भारती पवार यांचा राज्याच्या आरोग्य विभागावर निशाणा; म्हणाल्या…

जातीयवादाच्या वक्तव्यावरून सध्या राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सामना रंगलेला दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माबरोबर जातीचा मुद्दा मोठा झाला असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करता राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज ठाकरे यांनी पु्ण्यातूनच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; पण ‘या’मुळे मिळाला मोठा दिलासा

मला प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी मी सर्वांची पुस्तके वाचली आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे विचारही मी वाचले आहेत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या काळातले होते, असे सांगताना माझ्या आजोबांचे लिखाण आपल्याला हवे तेवढेच घ्यायचे असे चालणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मी यशवंतरावांबाबतही वाचले असून त्यांचेही मत काय होते हे मला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.

क्लिक करा आणि वाचा- रावसाहेब दानवे यांची राहुल गांधींवर जहरी टीका; आघाडीचे नेते भडकले

राज ठाकरे यांची भूमिका पाहता येत्या काही दिवसात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यांच्यातील हा मतभेद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Source link

pune tour by raj thackerayraj thackerayraj thackeray vs ncpराज ठाकरेराज ठाकरेंचा पुणे दौरा
Comments (0)
Add Comment