वायरलेस इमर्जन्सी अलर्ट्सचं महत्व
इमर्जन्सी अलर्ट्स हे इमर्जन्सी नोटिफिकेशन सिस्टमचा भाग आहेत ज्याचा वापर करून सरकार दूरसंचार विभागाच्या मदतीनं आगामी नैसर्गिक संकट किंवा आपत्कालीन परिस्थितीची सूचना देऊ शकतं. ह्यामुळे आगामी संकटाची पूर्वसूचना देऊन लोकांचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकते.
वाचा: एअरोप्लेन मोड ऑन करून देखील आलं नाही मोबाइल नेटवर्क? मग ह्या टिप्स मिळवून देतील सिग्नल
ह्या अलर्ट सिस्टमचा वापर फक्त नैसर्गिक संकटांच्या वेळीच करता येईल असं नाही तर युद्ध किंवा तत्सम इमर्जन्सीच्या वेळी देखील करता येईल. कोविड काळात अशा सिस्टम वापर माहितीचा प्रसार करण्यासाठी करता आला असता. हा रेडिओ किंवा टीव्हीवरील इमर्जन्सी ब्रॉडकास्टचा पर्याय आहे असं समजा फक्त इथे स्मार्टफोन्सचा वापर केला जाईल. दिवसेंदिवस टीव्ही आणि रेडिओच्या तुलनेत स्मार्टफोनचं महत्व वाढत असल्यामुळे ही पद्धत आता जास्त योग्य वाटते.
वायरलेस इमर्जन्सी अलर्ट्स कसे ऑन करायचे
वायरलेस इमर्जन्सी अलर्ट्स अँड्रॉइडच्या सेटिंगमध्ये सेफ्टी अँड इमर्जन्सी ऑप्शनखाली आहेत. तसेच इमर्जन्सी अलर्ट्स बहुतांश स्मार्टफोन्सवर अगदी सुरवातीपासून ऑन असतात, परंतु जर तुम्हाला आतापर्यंत असे अलर्ट्स आले नसतील तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता:
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग ओपन करा.
- खाली स्क्रोल करून ‘सेफ्टी अँड इमर्जन्सी’ ऑप्शनवर जा.
- तिथे ‘वायरलेस इमर्जन्सी अलर्ट्स’ ऑप्शन शोधा.
- इथे असलेला टॉगल ऑन आहे की नाही ते पाहा, नसेल तर ऑन करा.
वाचा: WhatsApp चं खास फीचर, आता एकदम HD Quality मध्ये पाठवा फोटो
जर टॉगल ऑन असेल तर कोणत्या प्रकारचे अलर्ट्स इनेबल आहेत ते पाहा. ह्यात एक्सट्रीम थ्रेट्स, सेव्हिअर थ्रेट्स (ह्यांचं टेस्टिंग सध्या भारत सरकार करत आहे), अँबर अलर्ट्स, टेस्ट अलर्ट्स आणि एरिया अपडेट ब्रॉडकास्टचा समावेश आहे. जर ह्यातील अलर्ट किंवा ब्रॉडकास्ट ऑन नसतील तर सर्व ऑन करा.
बस्स इतकंच करा! म्हणजे आता तुमच्या स्मार्टफोनवर ह्या सिस्टमच्या माध्यमातून येणारे अलर्ट्स येतील.