‘करिअर प्लॅनिंग म्हणजे काय? माहित आहे का.. ‘या’ टिप्स वाचा आणि आजच तयारीला लागा..

Career Panning Tips: आपल्याला करिअर म्हणजे काय याची समज येण्याच्या आधीच एक प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे, तुला मोठेपणे काय बनायचे आहे?.. या प्रश्नाचे तेव्हा आपण मनाला येईल ते, आवडेल ते उत्तर देतो पण जेव्हा आपण दहावी- बारावीचे शिक्षण पूर्ण करून पुढच्या टप्प्यात वळतो तेव्हा मात्र करिअरची चिंता खऱ्या अर्थाने सतावू लागते.

बऱ्याचदा आपल्या गरजा, आवड आणि आर्थिक निकड पाहून आपण करिअरचा विचार करतो, पण अनेकांना त्यात मनासारखे यश मिळत नाही. म्हणजे काम मनासारखे नसते, कधी पगार तर कधी वातारावण. बऱ्याचदा आर्थिक आणि पदोन्नती देखील होत नाही. तेव्हा आपला निर्णय चुकलाय की काय असे सतत वाटू लागते. अशी वेळ अनेकांच्या वाट्याला येत असते, आणि त्यामागेही एक कारण आहे. ते म्हणजे करिअर प्लॅनिंग नसणे.

आता तुम्ही म्हणाल हे करीअर प्लॅनिंग म्हणजे काय? तर आधी ते जाणून घेऊया..

करिअर प्लॅनिंग म्हणजे आपल्याच भविष्याचे आपण नियोजन करणे. कारण आयुष्याचा एक टप्पा ओलांडला की आपल्याला नेमके काय करायचे आहे, कुठे पोहोचायचे आहे, ध्येय काय आहे, ठराविक वर्षात आपण स्वतःला कुठे पाहतो आहोत हे ठरवून घ्यायला हवे. ते जर ठरवता आले नाही तर पुढचे नियोजन करणे मुश्किल असते. त्यासाठी एकदा ध्येय निश्चित करून तिथपर्यंत कसे पोहोचायचे याची योजना म्हणजेच करिअर प्लॅनिंग होय. मग ते प्लॅनिंग करताना नेमके काय करावे लागते ते पाहूया…

स्व- संवाद:

करियर काय निवडायचे हा प्रश्न समोर आल्यानंतर आधी स्वतःची संवाद करणे गरजेचे आहे. कारण तुम्ही दहा जणांना जरी विचारले कि मी करिअर मध्ये काय करू… तर ते त्यांच्या अनुभवातून उत्तर देतील. पण तुम्हाला तुमचे करिअर घडवायचे असल्याने स्वतःला काय व्हावेसे वाटते आहे, त्याला प्राधान्य द्या. त्यामुळे आधी आपल्याच मनाला विचारा की आपली आवड काय, कोणते क्षेत्र आपण काम म्हणून स्वीकारू शकतो.

(वाचा: Competitive Exam Tips: स्पर्धा परीक्षा देताय? मग सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून करा ‘या’ गोष्टी..)

पर्याय शोधा:

जर तुमचे आधीपासूनच ठरले असेल अमुक एका क्षेत्रात करिअर करायचे तर त्याचे नियोजन करा. पण जर तसे नसेल तर पर्याय शोधा. तुम्हाला काय येते, कशाची आवड आहे त्यानुसार कोणत्या क्षेत्रात काम करता येईल त्याचे पर्याय शोधा. मग त्यातही प्राधान्यक्रम ठरवा. त्यातल्या उणीवा, मर्यादा समजून घ्या आणि त्यातून एका पर्यायाकडे करिअर म्हणून पहा.

आराखडा महत्वाचा:

करियर निवडल्यानंतर स्वतःचे ध्येय निश्चित करा. ज्या क्षेत्रात आपण चाललो आहोत तिथे आपण पाच वर्षांनी नेमके काय करणार आहोत, कोणत्या पदावर जाणार आहोत, आर्थिक दृष्ट्या आपले स्वप्न काय आहे हे ठरवा. त्या दृष्टीने करिअरचा आराखडा तयार करा. म्हणजे तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी काय काय गरजेचे आहे, त्याची वाटचाल कशी असेल, त्यातले चढउतार या सगळ्याची एक रूपरेषा मनात तयार हवी. कारण नियोजन केले नाही तर ध्येय गाठणे कठीण जाते.

शोध घेत राहा:

नोकरीमध्ये स्थिरावल्यानंतरही आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यातले नावीन्य शोधात राहा आणि त्यानुसार स्वतः मध्ये बदल करत राहा. प्रगती करायची असेल तर आपल्याला प्रगतशील असणे गरजेचे आहे. त्यामुळे सतत नवे आणि वेगळे काय करता येईल याचा शोध घेत राहा. त्यातूनच अनेक संधी समोर येतात. मग त्या नोकरीच्या असो, किंवा प्रमोशन. पण स्वतःला अद्ययावत ठेवले की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोच.

आर्थिक ज्ञान महत्वाचे:

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सामान्य आर्थिक ज्ञान हे आपल्याकडे असायलाच हवे. आपल्याला मिळत असलेला पैसा वाढत राहायला हवा. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन, नोकरीत बदल, प्रमोशन या याद्वारे आर्थिक उन्नती साध्य करायला हवी. तसेच करियर मध्ये चांगल्या अर्थ तज्ज्ञांचे सल्लेही महत्वाचे असतात. कारण कमावलेले पैसे कशा पद्धतीने खर्च करायचे हेही कळायला हवे. योग्य वयात योग्य गुंतवणून जमायला हवी. जेणेकरून आपण आपले ध्येय ठरवलेल्या वेळेत गाठू शकतो.

(वाचा: Career Change Tips: नोकरी सोडताय? मग आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर…)

Source link

Career NewsCareer News In Marathicareer planningcareer planning for college studentscareer planning for studentsCareer Tipscareer tips in marathiJob Newsjob news marathijob tips
Comments (0)
Add Comment