फार्मसी करायची आहे? मग आधी बी. फार्मसी आणि डी. फार्मसी यातला फरक समजून घेऊया…

बारावीनंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर, इंजिनियर, एमबीए. सोशल वर्क आणि अन्य अनेक शाखांचे पर्याय खुले होतात. पण आजही अनेक विद्यार्थ्यांचा कल असतो तो फार्मसी करण्याकडे.त्यातही फार्मसी विषयी अनेक समज-गैरसमज आणि संभ्रम आहेत.

अनेकांना असे वाटते कि फार्मसी म्हणजे मेडिकल सुरु करण्यासाठीचा कोर्स. तर काहींना फार्मसी म्हणजे काय, बी फार्मसी म्हणजे काय, डी फार्मसी म्हणजे काय, त्यांच्यात फरक नेमका काय याविषयी पुरेशी माहितीच नसते. म्हणून जर तुम्हीही हा कोर्स करायचा विचार करत असाल तर जाणून घेऊया. फार्मसी विषयी काही महत्वाच्या गोष्टी…

फार्मसीला मराठी औषध निर्माणशास्त्र म्हणतात. बारावीनंतर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी बारावीला ‘पीसीएमबी’ म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर बारावीला किमान ५० टक्के आणि त्याहून जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे. केवळ या गुणांवर फार्मसीला प्रवेश मिळत नाही तर महाराष्ट्र शासनाची ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET) ही पूर्वपरीक्षा देखील उत्तीर्ण व्हावी लागते. या दोन्ही परीक्षांचे गुण ग्राह्य धरून मग फार्मसीमध्ये प्रवेश दिला जातो.

(वाचा: Competitive Exam Tips: स्पर्धा परीक्षा देताय? मग सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून करा ‘या’ गोष्टी..)

फार्मसीचे दोन प्रकार अभ्यासक्रमाला आहेत, ते म्हणजे ‘बी. फार्मसी’ आणि ‘’डी. फार्मसी’. त्या विषयी आता सविस्तर जाणून घेऊया…

‘बी.फार्मसी’

बारावी नंतर केला जाणारा हा अभ्यासक्रम ४ वर्षांच आहे. त्याचा फुल फॉर्म आहे ‘बॅचलर इन फार्मसी’. हा अभ्यासक्रम एकूण ८ सत्र परीक्षांमध्ये विभागला गेला आहे. बी. फार्मसी उत्तीर्ण झाल्यानंतर औषध निर्माण कंपनीत नोकरीच्या अनेक संधी असतात. शिवाय तुम्ही स्वतःचे मेडिकल देखील सुरु करु शकता.

‘डी. फार्मसी’

डी. फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी होय. बी. फार्मसी आणि डी. फार्मसी यामध्ये बराच फरक आहे. अनेकांना हे दोन्ही अभ्यासक्रम एकच आहे असे वाटते. पण तसे नाही, हा अभ्यासक्रम एकूण दोन वर्षांचा आणि चार सत्रांमध्ये विभागलेला असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही तुम्ही मेडिकल परवाण्यासाठी अर्ज करू शकता, आणि स्वतःचे मेडिकल सुरु करू शकता. याशिवाय औषध निर्मिती कंपनीत नोकरी देखील करू शकता. हे दोन्ही कोर्स केल्यानंतर औषध विक्री प्रतिनिधी म्हणूनही तुम्हाला अनेक संधी आहेत. पण औषधशास्त्र विषयात जर एखाद्या पदावर काम करायचे असते तर तुमच्याकडे ‘बी फार्मसी; ही पदवी असणे अनिवार्य आहे.

(वाचा: Top Acting Institute: अॅक्टर व्हायचंय? मग भारतातील ‘या’ टॉप इन्स्टिट्यूट विषयी नक्की जाणून घ्या..)

Source link

b pharmacy eligibilityb pharmacy feesCareer Newseducation newsJob Newspharma companyPharmacy Admissionpharmacy course detailspharmacy courses
Comments (0)
Add Comment