bharti pawar criticizes health department: डॉ. भारती पवार यांचा राज्याच्या आरोग्य विभागावर निशाणा; म्हणाल्या…

हायलाइट्स:

  • केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे राज्याच्या आरोग्य विभागावर टीकास्त्र.
  • नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच- डॉ पवार.
  • नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे- डॉ. पवार.

नंदूरबार: नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान राज्याच्या आरोग्य विभागावर टीकास्त्र सोडले आहे. नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधांवर बोलत असताना नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीका भारती पवार यांनी केली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या विकासासाठी मी वचनबद्ध असून केंद्रीय मंत्री म्हणून मी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देणार आहे, असे डॉ. पवार म्हणाल्या.

निधीची कमतरता भासू देणार नाही

तळोद्यातील आदिवासी विकास भवनात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. पवार यांनी राज्याच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे तत्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; पण ‘या’मुळे मिळाला मोठा दिलासा

आशा भगिनींचे केले कौतुक

जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मालेगावात आशा वर्कर्ससाठी आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात डॉ. पवार यांनी सहभाग नोंदवल. यावेळी डॉ. पवार यांनी आशा भगिनींचे कौतुक केले. करोनाच्या संकट काळात ग्रामीण आणि निमशहरी भागातील बालकांच्या, तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी मोठे योगदान दिले आहे. त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला आज दिलासा; करोनाचे दैनंदिन मृत्यू घटले, सक्रिय रुग्णांची संख्याही झाली कमी

करोनावर मात करायची असेल तर गावागावात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगत वेळोवेळी तपासणी करणे देखील गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. गाव पातळीवर ही जबाबदारी आशा भगिंनींनी सांभाळली. त्यांचे हे योगदान कौतुक करण्याजोगे आहे, असे त्या म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा- राहुल गांधींवर टीका करताना दानवेंची जीभ घसरली; आघाडीचे नेते भडकले

आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान डॉ. भारती पवार यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माजी वनमंत्री स्वर्गीय दिलवरसिंग पाडवी यांच्या समाधीस्थळी भेट दिली. खापर, अक्कलकुवा असा प्रवास करत त्यांनी गुजरात राज्यातील देवमोगरा देवीचे दर्शन घेतले.

Source link

dr. bharti pawarJan Ashirwad Yatraकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीजन आशीर्वाद यात्राडॉ. भारती पवार
Comments (0)
Add Comment