स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? थोडे दिवस थांबा; Vivo Y17s भारतीय सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट, पाहा माहिती

विवो बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन मोबाइल जोडू शकते. हा फोन वाय-सीरीजमध्ये Vivo Y17s नावानं एंट्री करू शकतो. डिवाइस आता ब्लूटूथ एसआयजी आणि भारतीय बीआयएस सर्टिफिकेशन वेबसाइट दिसला आहे. त्यामुळे ह्या फोनच्या लाँचच्या बातम्यानं उधाण आलं आहे. चला पाहूया ह्या लिस्टिंगमधून नेमकी कोणती माहिती समोर आली आहे.

Vivo Y17s झाला बीआयएसवर लिस्ट

Vivo Y17s स्मार्टफोन बीआयएस सर्टिफिकेशन आणि ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशनवर दिसला आहे. बीआयएस लिस्टिंग पाहता डिवाइस V2310 मॉडेल नंबरसह दिसला आहे. याव्यतिरिक्त सर्टिफिकेशन वेबसाइटवर इतर कोणतंही माहिती दिसली नाही. परंतु त्यामुळे डिवाइस लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल, हे मात्र निश्चित झालं आहे.

वाचा: वर्षभर चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन; रोज मिळणार २.५जीबी डेटा आणि Disney Hotstar चं सब्सस्क्रिप्शन

Vivo Y17s बजेट रेंजमध्ये ४जी टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो. ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील डिवाइसचा मॉडेल नंबर V2310 आहे. लिस्टिंगमधून फोनच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची माहिती मिळाली आहे. हा फोन ब्लूटूथ ५.० सपोर्टसह ब्लूटूथ एसआयजीवर लिस्ट झाला आहे.

Vivo Y17s चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

Vivo Y17s मध्ये ६.३ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यात हाय पिक्सेल रिजॉल्यूशन आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो. हा एक वॉटरड्रॉप डिजाइन असलेला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे कारण कंपनी बजेटमध्ये ही डिजाईन जास्त वापरते.

डिवाइसमध्ये युजर्सना मीडियाटेक प्रोसेसर दिला जाऊ शकतो. ग्राफिक्ससाठी पावर VR जीपीयू मिळण्याची शक्यता आहे. हँडसेटमध्ये ४जीबी रॅम व १२८जीबी इंटरनल स्टोरेजसह दिली जाऊ शकते. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील दिला जाऊ शकतो.

आगामी विवो स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात १३ मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि २एमपीची अन्य लेन्स मिळण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळू शकते.

वाचा: १२ हजारांच्या बजेटमध्ये ५२००एमएएचची दमदार बॅटरी; स्वस्त Honor Play 40S मध्ये ५जी कनेक्टिव्हिटी

डिवाइस ५०००एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो, जी १८वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्याची शक्यता आहे. Vivo Y17s मध्ये ब्लूटूथ, वायफाय, फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ४जी सपोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

Source link

vivovivo phonevivo y17sविवोविवो फोनविवो वाय१७एस
Comments (0)
Add Comment