गुगलने नोकरी नाकारली; पण जिद्द अशी होती की स्वतःचीच कंपनी सुरू केली.. अब्जाधीश बिन्नी बन्सलची यशोगाथा..

Flipkart Owner Binny Bansal Success Story: हल्ली एखादी नोकरी गेली, एखादी संधी हुकली की नैराश्यात जाणारे अनेक लोक आपण पाहतो. पण राखेतून फिनिक्स उडावा तशी जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. अशीच गोष्ट आहे बिन्नी बन्सल यांची. त्यांचे नाव कदाचित अनेकांना माहितही नसले पण एक नाव प्रत्येकाला माहित आहे ते म्हणजे ‘फ्लिपकार्ट’.

भारतात चांद्यापासून बांद्यापर्यंत घरपोच वस्तू देणारी म्हणजेच इ कॉमर्स सेवा पुरवणारी ही एक नामवंत कंपनी. पण या कंपनीची सुरुवात कशी झाली, याचाही एक खास किस्सा आहे. फ्लिपकार्टचे मालक बिन्नी बन्सल यांची ही प्रेरणादायी यशोगाथा तुम्हालाही नक्कीच नवी दिशा देईल.. .

फ्लिपकार्ट चे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी मोठ्या कष्टाने ही कंपनी उभारली आहे. आज फ्लिपकार्टचा टर्न ओव्हर अब्जावधी रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी त्याची सुरुवात अगदी शून्यातून झाली होती. एकेकाकी बिन्नी बन्सल यांना ‘गूगल’ने नोकरी नाकारली होती, पण त्यांची जिद्दी अशी होती की पुढे बन्सल यांच्याकडेच लाखो कर्मचारी कामासाठी होते.

(वाचा: Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या)

बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल एक दोघेही एकमेकांचे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. ते एकमेकांचे भाऊ आहेत असे अनेकांना वाटते, पण त्यांचे केवळ आडनाव एक आहे. त्या दोघांनीही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. ते आयआयटी दिल्लीच्या २००५ च्या बॅचचे विद्यार्थी होते. इथून उत्तीर्ण झाल्यानंतर बिन्नी याना जगप्रसिद्ध ‘गूगल’ सोबत काम करायचे होते. परंतु गुगलने बिन्नी यांना दोन वेळा नोकरी नाकारली.

पण हार मानतील ते बिन्नी कसले. त्यांनी आणखी जोमाने कामाला सुरुवात केली आणि स्वतःची कंपनी सुरु केली. फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून झाली. बिन्नी आणि सचिन यांनी एकूण २ लाख ७१ हजार रुपये जमा केले आणि फ्लिपकार्टची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी २००७ मध्ये बंगळुरू येथे एका २ बीएचके फ्लॅटमधून आपल्या कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर सचिनने फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून काम सुरू केले तर बिन्नी यांनी ई-कॉमर्स वेबसाइटच्या सीओओ पदाची जबाबदारी स्वीकारली.

२००७ मध्ये सुरु झालेल्या या कंपनीने २०१२ मध्ये १५० दशलक्ष डॉलरचा टप्पा पार केल्यानंतर फ्लिपकार्ट भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली. त्यानंतर ‘वॉलमार्ट’ने कंपनीचे ७७ टक्क्यांहून अधिक शेअर्स ताब्यात घेतले आणि बिन्नी आणि सचिन या दोघांनीही फ्लिपकार्ट कंपनी सोडली. आज कंपनी सोडली असली तरीही ते अब्जाधीश आहेत. आज घडीला बिन्नी बन्सल यांची एकूण संपत्ती ११ हजार ४६७ कोटी रुपये आहे तर सचिन बन्सल यांची एकूण संपत्ती १० हजार ६४८ कोटी रुपये आहे.

(वाचा: Top Acting Institute: अॅक्टर व्हायचंय? मग भारतातील ‘या’ टॉप इन्स्टिट्यूट विषयी नक्की जाणून घ्या..)

Source link

binny bansalCareer NewsCareer News In Marathiflipcart ceoflipkartflipkart newsJob Newsjob news in marathisuccess story
Comments (0)
Add Comment