पदभरतीचा तपशील :
- वर्ग १ संवर्गामध्ये यंत्र अभियंता पदांच्या ११ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
- तर, वर्ग -२ संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिकारी / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतुक ) पदांच्या ८ जागा, उप-यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (यांत्रिकी) पदांच्या १२ जागा, लेखा अधिकारी / लेखा परिक्षण अधिकारी पदांच्या ०२ जागा, भांडार अधिकारी पदांच्या ०२ जागा असे वर्ग २ मधील २४ जागांसाठी पदभरती प्रक्रिया येत आहे .
- यासोबच, संवर्ग २ मधील कनिष्ठ स्तर संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतुक) पदांच्या १२ जागा, सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थाक (यांत्रिक) पदांच्या ०९ जागा, सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी पदांच्या ०२ जागा, तर विभागीय सांख्यिकी अधिकारी पदांच्या ०७ जागा अशा वर्ग ०१, वर्ग ०२ व संवर्ग ब कनिष्ठ स्तर मिळून एकुण ६५ जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
(वाचा : WCL Apprenticeship 2023: १० वी, १२ वी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी वेस्टर्न कोलफिल्डसमध्ये अप्रेंटीसशीपची संधी)
01. यंत्र अभियंता वर्ग १ : ११ जागा
02. विभागीय वाहतुक अधिकारी वर्ग २ : ८ जागा
03. उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक: १२ जागा
04. लेखा अधिकारी / लेखा परिक्षण : ०२ जागा
05. भांडार अधिकारी : ०२ जागा
06. विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतुक) : १२ जागा
07. सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (यांत्रिक) : ०९ जागा
08. सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी : ०२ जागा
09. विभागीय सांख्यिकी अधिकारी : ०७ जागा
एकुण पदांची संख्या : ६५ जागा
शैक्षणिक पात्रता :
वरील सर्व जागांसाठी शैक्षणिक पात्रता, इतर अटी आणि नियम वेगवेगळे असल्यामुळे याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी एमएसआरटीसीच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेली मूळ जाहीरात पाहा.
अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता, इतर अटीही मूळ जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
(मूळ जाहीरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा)
महत्त्वाचे :
- वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांना मराठी बोलता, लिहीता आणि वाचता येणे अनिवार्य आहे.
- सर्व पदांकरिता उमेदवारांना MSCIT किंवा समकक्ष संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे गरजेचे.
- या भरतीसाठी आवश्यक सगळी कार्यवाही विहीत कालावधीमध्ये पूर्ण करणे गरजेचे आहे.
उमेदवारांची निवड आणि नेमणूकीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहीरातीमध्ये वाचा.
(वाचा : MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती)