Gmail Translate Feature: भलामोठा इंग्रजी ई-मेल आता चुटकीसरशी दिसणार मराठीत; डिक्शनरी शोधण्याची गरज नाही

जीमेल वेब ब्राऊजरवर ई-मेल्स ट्रान्सलेट करण्याची सुविधा खूप आधीपासून उपलब्ध होती. परंतु अँड्रॉइड आणि आयओएसवरील मोबाईल अ‍ॅप्सवर हे फिचर देण्यात आलं नव्हतं. परंतु आता वर्कस्पेस अपडेटमध्ये गुगलनं जीमेल ट्रान्सलेशन फिचर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ई-मेल ट्रान्सलेट करून वाचण्यासाठी आणखी एक अ‍ॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही.

“गेली अनेक वर्ष युजर्स वेबवरून जीमेलवरील ई-मेल गाडी सहज १०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित करत होते. आजपासून हे फिचर जीमेल मोबाइल अ‍ॅपमध्ये बिल्ट इन मिळणार आहे, त्यामुळे विविध भाषांच्या युजर्समधील संवादात अडथळा येणार नाही”, असं गुगलनं म्हटलं आहे.

वाचा: नव्या आयफोनच्या ऐवजी Apple नं विकला Demo Phone, भरावा लागणार दंड; असा ओळखा अस्सल iPhone

हे फिचर वापरण्यासाठी “Translate” नावाच्या एका पॉप अप वर क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला ज्या भाषेत भाषांतर हवं असेल ती निवडावी लागेल. तुम्ही एखाद्या भाषेसाठी हे फिचर कायमस्वरूपी चालू करून ठेवू शकता तसेच तुम्हाला माहित असलेल्या भाषांसाठी बंद देखील करून ठेऊ शकता.

सर्च जायंटनं सांगितलं आहे की हे फिचर आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हींवर रोलआऊट होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु सर्वांपर्यंत पोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. अँड्रॉइड अपडेटमधून रोलआऊट होण्यास ८ ऑगस्टला सुरुवात झाली आहे, तर २१ ऑगस्ट पासून आयओएस अपडेटला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अँड्रॉइड युजर्सना आयओएस युजर्स पूर्वीच हे फिचर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा अपडेट वर्कस्पेस युजर्ससह सर्व खाजगी युजर्सना दिला जाणार आहे.

वाचा: Tecno Pova 5 Pro 5G Price: ८जीबी रॅम असलेल्या स्वस्त फोनवरही १००० रुपयांची सूट, आजपासून विक्री सुरु

गुगलनं बॅन केले ४३ अ‍ॅप्स

अलीकडेच गुगलनं प्ले स्टोरवरून ४३ अ‍ॅप्स हटवले होते. हे अ‍ॅप्स डिवाइसची स्क्रीन बंद झाल्यावर देखील जाहिराती लोड करत होते तसेच युजर्सही माहिती लीक करत होते. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत होती आणि डेटाही जास्त वापरला जात होता. विशेष म्हणजे ह्या अ‍ॅप्समध्ये टीव्ही/डीएमबी प्लेयर, म्यूजिक डाउनलोडर, न्यूज आणि कॅलेंडर सारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता, जे जवळपास २५ लाख वेळा डाउनलोड करण्यात आले होते.

Source link

gmail translate featuregoogle translatehow to translate gmailगुगलजीमेलमराठीत ईमेल
Comments (0)
Add Comment