आयफोन वापरकर्त्यांचं WhatsApp बदलणार, खास इंटरफेस बीटा व्हर्जनवर सुरु

WhatsApp हे सद्यस्थितीला सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग अॅप आहे. मागील काही काळापासून WhatsApp नवनवीन अपडेट आणत असून आता WhatsApp iOS बीटा ऑपरेटिंग सिस्टमवर अ‍ॅप सेटिंग्जसाठी एक नवीन इंटरफेस आणत आहे. यामुळे युजर्सना एक नवीन आणि आधीपेक्षा भारी अनुभव मिळेल. WABetaInfo अहवालानुसार, बीटा वापरकर्त्यांच्या लक्षात येईल की सेटिंग्ज टॅब नवीन यू टॅबने बदलला गेला आहे. ज्यात संबधित युजरचा प्रोफाइल फोटो दिसतो. ज्यानंतर मल्टी-अकाउंट फीचर लाँच झाल्यावर वापरकर्त्यांना एका अकाउंटवरुन दुसऱ्या अकाउंटवर सहजपणे स्विच करता येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार या नवीन इंटरफेसच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स प्रायव्हसी सेटिंग्ज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि प्रोफाइलमध्ये सहज प्रवेश मिळवू शकतील. नवीन इंटरफेससह, प्लॅटफॉर्मने अ‍ॅपचे महत्त्वाचे विभाग अधिक चांगल्या प्रकारे हायलाइट करण्यासाठी तीन नवीन एंट्री पॉइंट्स देखील सादर केले आहेत. वापरकर्त्यांना एक नवीन शॉर्टकट दिसेल जो प्रोफाइल फोटोवर घेऊन जाईल, त्यांना त्यांचा वैयक्तिक QR कोड पाहण्याची आणि शेअर करण्याची परवानगी देईल.

काही बीटा परीक्षकांसाठी नवीन सेटिंग्ज इंटरफेस उपलब्ध
अहवालात असे म्हटले आहे की नवीन सेटिंग्ज इंटरफेस सध्या काही बीटा परीक्षकांसाठी केवळ उपलब्ध केला गेला आहे. जे टेस्टफ्लाइट अ‍ॅपवरून iOS साठी WhatsApp बीटा चे लेटेस्ट अपडेट आणते करतात आणि येत्या काही आठवड्यांमध्ये अधिक वापरकर्त्यांसाठी हे आणले जातील. गेल्या आठवड्यात, अशी बातमी आली होती की मेसेजिंग प्लॅटफॉर्मने Android आणि iOS वर कॅप्शन मेसेज एडिट फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. या फीचरसह, वापरकर्ते मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत व्हिडिओ, GIF आणि दस्तऐवजांसाठी कॅप्शन एडिट करू शकतात.

वाचा : iPhone 15 मिनिटांत होणार चार्ज, फास्ट चार्ज करु शकणाऱ्या केबलचा फोटो झाला लिक

Source link

ios whatsapp interfacewhatsapp latest updatewhatsapp new lookव्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसव्हॉट्सअ‍ॅप न्यू फीचर
Comments (0)
Add Comment