मुंबई पोलीस विभागात विविध पदांसाठी भरती; उद्या थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार निवड प्रक्रिया

Mumbai Police Recruitment 2023: मुंबई पोलीस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून, उद्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी होणार्‍या थेट मूलाखतीच्या माध्यमातून या जागांच्या पदभरतीसाथी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक पदांच्या एकूण १० जागांसाठी मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे. सदर पदभरतीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : १०

1. सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी
2. लेखा अधिकारी
3. कार्यालय अधीक्षक
4. प्रमुख लिपिक

नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत

(वाचा : Career Opportunities As Archaeologist: आर्किऑलॉजिस्ट म्हणून करिअर घडवायचंय…? कोणता करायचा कोर्स? कुठे मिळते नोकरी?)

महत्त्वाचे :

मुलाखतीचा पत्ता :

कार्यासन क्रमांक ८ पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई : ४०० ००१

मुलाखतीची तारीख : २३ऑगस्ट २०२३, सकाळी ११.०० वाजल्यापासून

वरील नमूद पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.

अधिक महितीसाठी मुंबई पोलीस यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

(वाचा : AIESL Recruitment 2023: टाटा समुहाच्या ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जाची पद्धत आणि पात्रता निकष)

Source link

Mumbai Policemumbai police newsmumbai police news todayMumbai Police RecruitmentMumbai Police Recruitment 2023
Comments (0)
Add Comment