महाराष्ट्र राज्य तलाठी भरती परीक्षेत अनागोंदी कारभाराची मालिका सुरूच; वर्ध्यातील एका परीक्षा केंद्रावर कर्मचाऱ्यानेच फोडला पेपर?

Maharashtra Talathi Bharti Exam 2023 Question Paper Leak News: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध विद्युत उपकरणांच्या मदतीने ऑनलाइन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२३ रोजी परीक्षेच्या पाचव्याच दिवशी ऑनलाइन परीक्षेदरम्यान, परीक्षा सुरू होण्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना वाट पाहायला लागली. तर, आज २३ ऑगस्ट २०२३ ला वर्धा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर, केंद्रावरील कर्मचाऱ्यानेच पेपर फोडल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून केला जात आहे.

(फोटो : प्रातिनिधिक)

जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या. परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिवसाला तीन सत्रामध्ये ही परीक्षा पार पडते. मात्र, वर्ध्यात आज पहिल्या सत्रामध्येच हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांकडून सादर कर्मचाऱ्यावर पेपर फुटीचा आरोप होतोय.

(वाचा : Talathi Bharti Exam 2023: तलाठी भरती परीक्षेच्या पाचव्याच दिवशी दुसरा गोंधळ; विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण)

वर्धा जिल्ह्यातील तलाठी परीक्षेच्या एका परीक्षा केंद्रावर, कर्मचारी लॅपटॉप घेऊन केंद्राबाहेर गेला होता. काही वेळाने हा कर्मचारी पुन्हा केंद्रात गेला. त्यामुळे या कर्मचाऱ्याने पेपर फोडल्याचा संशय व्यक्त करत सदर केंद्रावरील परीक्षार्थीनी या संदर्भात केंद्रावरील संबंधित व्यक्तीकडे तक्रारही केली आहे. शिवाय, या घटनेचा व्हिडिओही प्रसमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

सदर प्रकरणाच्या व्हायरल व्हिडीओतील संभाषानुसार..

केंद्रावर नेटवर्क इश्यू आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे (Network Issue and Technical Error) पेपर डाउनलोड करण्यासाठी हा कर्मचारी केंद्राबाहेर गेला असल्याचे मत केंद्र कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. मात्र, ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) असल्यामुळे पेपर डाऊनलोड करण्याची गरज का भासली? असा संतप्त सवाल परीक्षार्थींकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेला सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर शासनाच्या अनागोंदी कारभाराचे सत्र सुरूच असल्यामुळे, महाराष्ट्रातील तलाठी भरती परीक्षा २०२३ ला तूर्तास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्यावतीने केली जात आहे.

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज केले आहे.

परीक्षेच्या नियोजित तारखा खालील प्रमाणे :

१७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
२६ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३
३१ ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३
४ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३
८ सप्टेंबर २०२३ आणि १० सप्टेंबर २०२३
१३ सप्टेंबर २०२३ आणि १४ सप्टेंबर २०२३

(वरील सर्व तारखांना सत्राची वेळ)
सत्र १ : सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ : दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ : सायंकाळी ४.३० ते ६.३०

(वाचा : AIESL Recruitment 2023: टाटा समुहाच्या ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्जाची पद्धत आणि पात्रता निकष)

Source link

Breaking NewsExam to be cancelmaharashtra talathi question paper leakrevenue and forest department jobstalathi bharti 2023talathi bharti exam paper leaktalathi recruitment 2023Wardhawardha news
Comments (0)
Add Comment