१६ हजार रुपयांपर्यंतची बचत! Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 वर कंपनीनं आणली नवी ऑफर

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ५ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ५ बाजारात येऊन काही दिवस झाले आहेत. तसेच ह्यांची विक्री देखील गेल्या आठवड्यात १८ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. आता कंपनीनं ह्या दोन्ही स्मार्टफोन्सवर नवीन ऑफर्स सादर केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. तत्पूर्वी स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट, IPX८ रेटिंग आणि २५वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग असलेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.

गॅलेक्सी झेड फोल्ड ५, गॅलेक्सी झेड फ्लिप ५ ची किंमत

गॅलेक्सी झेड फोल्ड ५ च्या १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५४,९९९ रुपये आहे. तर , १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,६४,९९९ रुपये आहे. तर १२जीबी रॅम आणि १टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,८४,९९९ रुपये आहे. गॅलेक्सी झेड फ्लिप ५ पाहता ह्याच्या ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे. ८जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,०९,९९९ रुपये आहे.

वाचा: Jio Cinema ला टक्कर देण्यासाठी Disney Plus hotstar सज्ज, आशिया कपसह वर्ल्ड कपचे सामने लाईव्ह दाखवणार

गॅलेक्सी झेड फोल्ड ५, गॅलेक्सी झेड ५ फ्लिप वरील ऑफर्स

नवीन ऑफर्स पाहता गॅलेक्सी झेड फ्लिप ५ चे ग्राहक ७००० रुपयांच्या बँक कॅशबॅक आणि अपग्रेड बोनसचा लाभ घेऊ शकतात. युजरची एकूण १४,००० रुपयांची बचत होईल. तसेच ग्राहक ९ महिने नो कॉस्ट ईएमआयचा देखील पर्याय निवडू शकतात. ही ऑफर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

गॅलेक्सी झेड फोल्ड ५ च्या ग्राहकांना ७००० रुपयांचा बँक कॅशबॅक आणि ९००० रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जाईल. म्हणजे ग्राहकांचे एकूण १६,००० रुपये वाचतील. तसेच नव्या फोल्डची खरेदी तुम्ही ९ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकता. ही ऑफर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवरच उपलब्ध आहे.

वाचा: Gmail Translate Feature: भलामोठा इंग्रजी ई-मेल आता चुटकीसरशी दिसणार मराठीत; डिक्शनरी शोधण्याची गरज नाही

जे ग्राहक आपला जुना स्मार्टफोन अपग्रेड करून Galaxy Z Flip 5 विकत घेण्याचा विचार करत आहेत त्यांना ईएमआयचा पर्याय न घेतल्यास ९००० रुपयांचा बोनस मिळू शकतो. ज्या ग्राहकांना फोन अपग्रेड करायचा आहे आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील हवा तर त्यांना ७००० रुपयांचा अपग्रेड बोनस आणि २४ महिने नो-कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जाईल.

ज्या ग्राहकांना जुना स्मार्टफोन अपग्रेड करून गॅलेक्सी झेड फोल्ड ५ विकत घ्यायचा आहे त्यांना ईएमआयचा पर्याय न वापरल्यास ११,००० रुपयांचा बोनस मिळेल. ज्या ग्राहकांना अपग्रेडसह नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय हवा असेल तर त्यांना ९००० रुपयांचा अपग्रेड बोनस आणि २४ महीने नो-कॉस्ट ईएमआयची ऑफर दिली जाईल. विशेष म्हणजे वरील ऑफर Galaxy Z Flip 5 च्या ५१२जीबी व्हेरिएंट आणि Galaxy Z Fold 5 च्या ५१२जीबी आणि १टीबी व्हेरिएंटवर देखील उपलब्ध आहे.

Source link

galaxy z flip 5galaxy z fold 5samsungगॅलेक्सी झेड फोल्ड ५गॅलेक्सी झेड फ्लिप ५सॅमसंग
Comments (0)
Add Comment