परवडणाऱ्या किंमतीत आले रियलमीचे दोन भन्नाट स्मार्टफोन; १६जीबी रॅम, १०८एमपीचा कॅमेरा आणि बरंच काही…

Realme 11 सीरीजमधील Realme 11 5G आणि Realme 11X 5G स्मार्टफोन्स भारतात सादर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर Realme Buds Air 5 Pro आणि Buds Air 5 true wireless earbuds देखील लाँच करण्यात आले आहेत. स्पेसिफिकेशन पाहता, रियलमी ११ स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी ११एक्स ५जी फोन ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात २एक्स इन-झूम फीचर देण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

Realme 11 5G ची किंमत

Realme 11 5G मध्ये ८जीबी रॅम देण्यात आला आहे. फोनचा १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट १८,९९९ रुपये तर २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट १९,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन Glory Gold आणि Glory Black कलर ऑप्शनसह आला आहे. ह्याची विक्री २९ ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून Realme आणि Flipkart वर सुरु होईल, ज्यात लाँच ऑफर अंतगर्त १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

वाचा: आयफोनच्या तोडीचा स्मार्टफोन! Vivo X100 सीरीजच्या लाँचची कंपनीनेच दिली माहिती; असे असू शकतात फिचर

Realme 11X 5G ची किंमत

Realme 11X 5G फोनचे दोन व्हेरिएंट आले आहेत. त्यातील ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर ८जीबी रॅम १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. कंपनीनं हा फोन Purple Dawn आणि Midnight Black कलर ऑप्शनसह सादर केला आहे. ह्याची विक्री ३० ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून सुरु होईल. लाँच ऑफर अंतगर्त फोनवर १,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

Realme 11 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी ११ ५जी स्मार्टफोनमध्ये ६.७२ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्या डिस्प्लेचा रिफ्रेश १२०हर्ट्झ आणि रिजोल्यूशन २४००×१०८० पिक्सल आहे. तसेच, हा फोन MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरसह बाजारात आला आहे. जोडीला ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोन अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय ४.० वर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात ३एक्स इन-सेन्सर झूम आहे. सोबत २ मेगापिक्सलचा पोट्रेट कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आहे, जी ६७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा: बोटापेक्षाही बारीक असू शकतो Vivo V29e 5G; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

Realme 11X 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी ११एक्स ५जी स्मार्टफोनमध्ये ६.७२ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्या डिस्प्लेचा रिफ्रेश पण १२०हर्ट्झ आणि रिजोल्यूशन २४००×१०८० पिक्सल आहे. हा फोन देखील MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरसह येतो. सोबत ८जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय ४.० वर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचबरोबर एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनची बॅटरी ५०००एमएएचची आहे, जोडीला ३३वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

Source link

realmerealme 11 5grealme 11x 5gरियलमीरियलमी ११ ५जीरियलमी ११एक्स ५जी
Comments (0)
Add Comment