Redmi A2 ची किंमत
रेडमी ए२ आता तीन व्हेरिएंटमध्ये भारतात उपलब्ध झाला आहे. २जीबी रॅम व ३२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ५,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर २जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६,४९९ रुपये आहे. फोनचा ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज मॉडेल ७,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर नव्या ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाइटसह रिटेल स्टोर्स आणि अॅमेझॉनवरून Aqua Blue, Classic Black आणि Sea Green कलरमध्ये विकत घेता येईल.
वाचा: परवडणाऱ्या किंमतीत आले रियलमीचे दोन भन्नाट स्मार्टफोन; १६जीबी रॅम, १०८एमपीचा कॅमेरा आणि बरंच काही…
Redmi A2 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी ए२ २०:९ अॅस्पेक्ट रेशियो, १६०० x ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५२ इंचाच्या एचडी+ डॉटड्रॉप डिस्प्लेला सपोर्ट करतो. रेडमी ए२ मध्ये फेस अनलॉक फीचर मिळतं.
हा रेडमी फोन अँड्रॉइड १३ ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे जो २.२गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी३६ ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ह्यात ३जीबी वचुर्अल रॅम देखील मिळतो. हा एक ४जी फोन आहे ज्यात ब्लूटूथ ५.०, २.४गीगाहर्ट्झ वायफाय आणि ३.५एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.
वाचा: वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक
शाओमी रेडमी ए२ च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे. फ्रंट पॅनलवर ५ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी Redmi A2 मध्ये ५,०००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा मोबाइल फोन १०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.