Realme Buds Air 5 Pro ची किंमत
Realme Buds Air 5 Pro कंपनीनं सनराइज बेज आणि एस्ट्रल ब्लॅक कलर्समध्ये लाँच केला आहे. हा Realme.com, Amazon, Flipkart आणि रिटेल स्टोरवरून विकत घेता येईल. भारतात रियलमी बड्स एयर ५ प्रोची किंमत ४,९९९ रुपये आहे, परंतु लाँच ऑफर अंतगर्त हे ४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील. ह्यांची विक्री २९ ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून सुरु होईल.
(सौजन्य: रियलमी इंडिया)
Realme Buds Air 5 ची किंमत
दुसरीकडे Realme Buds Air 5 कंपनीनं डीप सी ब्लू आणि आर्कटिक व्हाइट कलरमध्ये लाँच केले आहेत. बड्स एयर ५ ची किंमत ३,६९९ रुपये आहे परंतु सुरवातीचे काही दिवस हे ३,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध होतील. ह्यांची विक्री २६ ऑगस्टला दुपारी १२ वाजता सुरु होईल आणि Realme.com, Flipkart सह रिटेल स्टोरवरून खरेदी करता येईल.
(सौजन्य: रियलमी इंडिया)
वाचा: परवडणाऱ्या किंमतीत आले रियलमीचे दोन भन्नाट स्मार्टफोन; १६जीबी रॅम, १०८एमपीचा कॅमेरा आणि बरंच काही…
रियल बूस्ट ड्रायव्हर्स
रियलमी बड्स एयर ५ प्रोल वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससाठी IPX5 रेटिंग रेटिंग देण्यात आली आहे. हे बड्स स्टेम डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीनुसार, ह्या सेगमेंटमध्ये प्रथमच कोएक्सियल ड्युअल ड्रायव्हर्स देण्यात येतील, ज्याला कंपनीनं ‘रियल बूस्ट ड्युअल ड्रायव्हर्स’ असं नाव दिलं आहे.
(सौजन्य: रियलमी इंडिया)
३६० डिग्री स्पेशियल ऑडिओ
बड्समध्ये ३०% लो-फ्रीक्वेंसी बूस्ट आणि २००% हाय-फ्रीक्वेंसी बूस्टसह ११ मिमी बास ड्रायव्हर्स आहेत. हे 990kbpx LDAC वायरलेस एचडी ट्रांसमिशन, हाय-रेज ऑडियो सर्टिफिकेशन आणि ३६०-डिग्री स्पेशियल ऑडियोला सपोर्ट देखील सपोर्ट करतात.
(सौजन्य: रियलमी इंडिया)
वाचा: स्वस्त Redmi A2 झाला आणखी मस्त; रॅम आणि स्टोरेजमध्ये झाली वाढ
६ माइक नॉइज कॅन्सलेशन
रियलमीने बड्स एयर ५ प्रोमध्ये अॅडव्हान्स नॉइज कॅन्सलेशन फिचर देण्यात आलं आहे. ह्यात ५०डेसिबलपर्यंत एएनसी आणि ६-माइक कॉल नॉइज कॅन्सलेशनचा समावेश आहे. इतर फीचर्समध्ये ड्युअल डिवाइस कनेक्शन २.०, ४०मिली सेकंड सुपर लो लेटेंसी आणि ब्लूटूथ ५.३ चा समावेश आहे. बड्स एयर ५ प्रो एकदा चार्ज केल्यावर ४० तास पर्यंतचा प्लेबॅक देतात असं कंपनीनं सांगितलं आहे. हे १० मिनिटांच्या चार्जमध्ये ७ तासांचा प्लेबॅक देतात.
(सौजन्य: रियलमी इंडिया)
रियलमी बड्स एयर ५
बड्स एयर ५ प्रो व्हेरिएंट प्रमाणे वॅनिला व्हेरिएंटमध्ये नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे, ज्यात ५०डेसिबल एएनसी आणि ६-माइक कॉल नॉइज कॅन्सलेशनचा समावेश आहे. इअरबड्स मध्ये ४५मिली सेकंड सुपर लो लेटेंसीसह एक अॅडव्हान्स १२.४ मिमी मेगा टायटेनाइजिंग ड्रायव्हर सेटअप आहे. हे एकदा चार्ज केल्यावर ३८ तास सहज वापरता येतात असा कंपनीनं दावा केला आहे. इतर अनेक फीचर्स बड्स एयर ५ सारखे आहेत.
वाचा: वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक