Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील परिचारिका पदाच्या रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ७२ जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. २९ ऑगस्ट २०२३ रोजी उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
उमेदवारांना कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे लागणार आहे. ठाणे महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
उमेदवारांना कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे लागणार आहे. ठाणे महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
(वाचा : Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड भरती अंतर्गत इंजिनीयर्सना नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदावर भरती सुरु)
पदभरतीचा तपशील :
पदाचे नाव : परिचारिका (नर्स)
एकूण रिक्त जागा : ७२ पदे
नोकरीचे ठिकाण : ठाणे.
(या भरतीमधील या जागांसाठी आरक्षणाच्या आधारावर काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अधिक महितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली जाहीरात पाहा)
शैक्षणिक पात्रता :
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) ची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम)
- बी.एस्सी (नर्सिंग) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / स्टाफ नर्स कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
मुलाखतीची तारीख :
मुलाखतीची सुरवात – २९ ऑगस्ट २०२३ सकाळी ११ वाजता.
मुलाखतीचा शेवट – २९ ऑगस्ट २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण :
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)