‘आयबीपीएस’ मध्ये १४०२ पदांसाठी महाभरती! अर्ज करण्याची घाई करा; कारण…

बँकेची नोकरी ही आजही प्रचंड प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे देशातील लाखो तरुण बँकेच्या परीक्षा देत असतात, बँकेत नोकरी मिळावी म्हणून धडपडत असतात. म्हणूनच अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे ‘आयबीपीएस’ने म्हणजे ‘द इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ने १ हजारांहून अधिक पदाची भरती जाहीर केली आहे.

‘आयबीपीएस’ने (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनी (CRP PO/MT) आणि स्पेशलिस्ट ऑफिसर्स (IBPS SO) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरतीसाठीची मुदत संपली होती, पण आता त्याला मुदतवाढ मिळाली आहे. आता इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज नोंदणी ऑनलाईन माध्यमातून होणार असून त्यासाठीची अंतिम तारीख २८ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी असून तातडीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी https://ibps.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज दाखल केल्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या उमेदवारांना परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र किंवा कॉल लेटर्स सप्टेंबर २०२३ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे तर स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदाच्या उमेदवारांना डिसेंबरमध्ये प्रवेशपत्र मिळतील असा अंदाज आहे.

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

आयबीपीएस पीओ /एसओ भरतीसाठी अर्जाचे शुल्क

सर्व खुल्या वर्गातील उमेदवारांना ८५० रुपये तर राखीव गटातील उमेदवारांना १७५ रुपये

आयबीपीएस पीओ आणि एसओ भरतीसाठीची रिक्त पदे आणि जागा…

आयटी ऑफिसर(स्केल-I) – १२०
अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर (स्केल-I) – ५००
लॉ ऑफिसर (स्केल-I) – १०
एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I) -३१
मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) – ७००
मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) – ४१
एकूण रिक्त जागा – १४०२

आयबीपीएस पीओ आणि एसओ २०२३ भरती २०२३ मुदत वाढीची अधिसुचना आणि इतर तपशील या https://www.ibps.in/wp-content/uploads/PO_SPL_Corrigendum-for-extension.pdf लिंक मध्ये पाहता येईल.
‘आयबीपीएस एसओ’साठी थेट https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/ या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
तर ‘आयबीपीएस पाीओ’ या पदासाठी https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/ या लिंकवर क्लिक करा.

(वाचा: Job Tips For Office Behavior: ऑफिसमध्ये आवर्जून पाळा या गोष्टी, करिअरमध्ये कधीही येणार नाहीत अडचणी..)

Source link

Career NewsGovernment jobibpsibps latest newsibps poibps recruitmentJob News
Comments (0)
Add Comment