Google Maps वापरताना खूपच कामाला येतील ‘हे’ फीचर्स, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : Google Maps Latest Features : वाढत्या टेक्नोलॉजीमुळे रोजच्या जीवनातील बरीच कामं सोपी झाली आहेत. आता हेच बघाना एकेकाळी कुठे लांब फिरायला जायचे असल्यास अनेकांना विचारुन रस्त्याची माहिती घेऊन जावं लागायचं पण आजकाल गुगल मॅप्सने हे काम इतकं सोपं केलं आहे, की अगदी घरबसल्या आपण जगाच्या कोपऱ्यातील कोणत्याही ठिकाणंचा रस्ता पाहू शकतो. रस्त्यावरील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येलाही सामोरे जावे लागत असताना गुगल मॅपमुळे रिअलटाईम ट्रॅफिक अपडेट्सही आजकाल मिळतात. पण याच गुगल मॅपची अशी बरीच फीचर्स आहेत, जी खूप कामाला तर येतीलच शिवाय तुमचा युजर एक्सपिरियन्स आणखी भारी होईल, चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

वाहन निवडा

Google मॅप्स तुम्ही कोणत्या वाहनाने प्रवास करत आहात, त्यानुसार रस्ता आणि लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स दाखवतात. त्य़ामुळे Google मॅप्सवर सर्वोत्तम आणि जलद मार्ग निश्चित करण्यासाठी तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग्य चिन्ह म्हणजे, बाईक कि कार हे निवडा. कारण मॅप्स निवडलेल्या वाहन प्रकारावर आधारित सर्वात जलद उपलब्ध मार्ग दाखवेल.

ऑफलाइन मॅप डाउनलोड करा
प्रवास करताना एक मोठी भिती म्हणजे कधी नेटवर्क गेलं तर, ज्याशिवाय नेव्हिगेशन अॅप्स क्रॅश होऊ शकते. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही जात असलेल्या ठिकाणचा ऑफलाइन नकाशा डाउनलोड करणं केव्हाही फायदेशीर ठरते. वापरकर्त्यांना गुगल मॅपवर विशिष्ट शहरांचे नकाशे डाउनलोड करण्याची सुविधा देखील मिळते.

व्हॉइस नेव्हिगेशन चालू करा
व्हॉइस नेव्हिगेशन हे Google मॅप्सवरील आणखी एक उत्कृष्ट फीचर आहे, जे वापरकर्त्याला आवाज दिशानिर्देश देते. हे एक अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य आहे, विशेषत: प्रवास करताना हेडफोन वापरताना. या फीचरमुळे प्रवास करताना फोनच्या स्क्रीनकडे वारंवार पाहण्याचा त्रास दूर होतो. मोड पोहोचल्यावर ते तुम्हाला अलर्ट देखील करते. यासोबतच, तुम्ही तुमच्या सोयीनुसार, सामान्य आणि जास्त प्रमाणात त्याचा आवाज कमी करू शकता.

वाचा: काय सांगता? फक्त ४ ग्राम वजनाचे इअरबड्स! ५५ तास बॅटरी बॅकअपसह किंमत १,४९९ रुपये

Source link

google maps best featuresgoogle maps kasa vapraychahow to use google mapsगुगल मॅप्स कसं वापरालगुगल मॅप्सचे खास फीचर्स
Comments (0)
Add Comment