जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मंत्री दिवसभर जनता आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. तर, यात्रेमुळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या गर्दीमुळं करोना नियमांची पायमल्ली झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी शासनाने अद्यापही सार्वजनिक कार्यक्रम आणि समारंभावर निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र, जनआशीर्वाद यात्रेनिमित्त अनेक भागांत करोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
वाचाः रोहित पवारांनी सांगितला राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा
१९ ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गंत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसताना ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वाचाः आत्महत्येचा इशारा देणाऱ्या देवरेंच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार
दरम्यान, भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढून सरकारने लागू केलेल्या करोनानियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजक असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह ७० ते ८० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.
वाचाः ‘ते मोदी सरकारने करुन दाखवले’; भाजपचा शरद पवारांवर निशाणा