बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा, तर एक भारतीय भाषा शिकणे अनिवार्य; काय आहे नव्या शैक्षणिक धोरणातील निर्णय

New Education Policy Updates: दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता दोन टप्प्यात होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर्ड परीक्षासंदर्भात हा मोठा बदल आमलात आणला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy ) अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्यावतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ ला देण्यात आली. आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जाणार असून, बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत.

शिवाय, विद्यार्थ्यांचा ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त त्याच विषयाचे पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सोबतच, अकरावी आणि बारावीला दोन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका भारतीय भाषेचा समावेश असायला हवा, अशी अट घालण्यात आली आहे. काल ( केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काय काय निर्णय घेतले याबाबत जाणून घेऊयात..

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोन टप्प्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्षातून दोन्ही वेळा बोर्डाची परीक्षा देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर मिळणाऱ्या गुणांपैकी सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार (new curriculum framework), अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यापुढे दोन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. शिवाय, त्यापैकी एक भारतीय भाषा असणे गरजेचे आहे, अशी अट घालण्यात आली आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असून, पुढील शैक्षणिक वर्षासाठी या नियमानुसार शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके (textbooks) तयार केली जाणार आहेत.

आताच्या बोर्डाच्या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भार कमी व्हावा यासाठी हा नवा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शिक्षणाच्या या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मुल्यांकन करता येईल.

नव्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी वर्षातून किमान दोनदा बोर्ड परीक्षा दिल्या जात आहेत, असे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असणाऱ्या या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषायाची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देता येणार आहे. निकालानंतर ज्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम गुण मिळाले असतील अशा गुणांचा विचार अंतिम निकालासाठी केला जाणार आहे.

याशिवाय, अकरावी-बारावीसाठी विषयांची निवड विद्याशाखानिहाय, म्हणजेच कला, विज्ञान आणि वाणिज्य, बायफोकल अशी राहणार नसून कोणत्याही शाखेतील विविध विषय निवडण्याचे स्वातंत्र्य नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Source link

board examsBoard Exams will be conducted twice a yearEducation Departmenteducation ministryeducation newsIndian language Compulsorynew curriculum frameworknew education policyNew Education Policy Updates
Comments (0)
Add Comment