डार्क वेब म्हणजे काय?
तुम्हाला माहित असेल की डार्क वेब हा इंटरनेटवरील असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर बेकायदेशीर कारवाया केल्या जातात, ज्यात चोरलेली खाजगी माहिती विकण्याचा देखील समावेश असतो. इंटरनेटचा हा भाग अॅक्सेस करणं सोपं नाही त्यामुळे सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवणं कठीण होऊन जातं.
वाचा: जगात वापरल्या जाणाऱ्या टॉप-१० अॅप्समध्ये भारताचं अॅप नाही, वाचा सविस्तर
डार्क वेब रिपोर्टचा फायदा
गुगल वन सब्स्क्रायबर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी डार्क वेब रिपोर्ट फिचर सादर करण्यात आलं आहे. ह्यामुळे युजर्सना त्यांची माहिती लीक झाली असेल किंवा डार्क वेबवर दिसली असेल तर अलर्ट पाठवला जातो. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला एक खास प्रोफाइल बनवावा लागेल जिथे तुम्हाला कोणत्या माहितीवर लक्ष ठेवायचं आहे ते निवडावं लागेल. जर ती माहिती डार्क वेबवर दिसली तर गुगल तुम्हाला अलर्ट पाठवेल.
गुगल वन सब्स्क्रायबर्स डार्क वेब फिचरचा वापर करून त्यांचं नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी (जास्तीत जास्त १०) आणि फोन नंबर्स डार्क वेबवर लीक झालेत का पाहू शकतात. तसेच तुम्ही रियल-टाइम अपडेट आणि डेटा मॅनेज करण्यासाठी सल्ला देखील मिळवू शकता.
वाचा: …म्हणून ४३ अँड्रॉइड अॅप्सवर गगूलनं घातली बंदी; तुमच्या फोनमधूनही त्वरित हटवा
सर्वच गुगल युजर्सना देखील हे फिचर वापरता येईल परंतु त्यातून फक्त ई-मेल आयडीवरच लक्ष ठेवता येईल. गुगल वन सब्स्क्रायबर्स प्रमाणे इतर माहिती मॉनिटर करता येणार नाही.
सध्या भारतात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे गुगलचं डार्क वेब फिचर योग्य वेळी देशात आलं आहे असं म्हणता येईल. भारतातील गुगल वन सब्स्क्रायबर्सच्या डेटा सुरक्षेत ह्या फिचरमुळे नक्कीच भर पडेल.