राज ठाकरेंनी ट्वीट केले प्रबोधनकार ठाकरेंचे विचार; राजकीय चर्चांना ऊत

हायलाइट्स:

  • राज ठाकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा
  • प्रबोधनकार ठाकरेंचे विचार केले ट्वीट
  • राज ठाकरेंच्या ट्वीटमुळं राजकीय चर्चांना ऊत

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही राज यांना उत्तर दिलं होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांना ‘आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचावी,’ असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी एक सूचक ट्वीट केलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाधा या पुस्तकाती विचार त्यांनी ट्वीट केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, या व्यक्तव्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी एक ट्वीट करत राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.

रोहित पवारांनी सांगितला राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ
‘जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!’- प्रबोधनकार ठाकरे, ‘माझी जीवनगाथा’, असं राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना राज यांना ‘आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचावी,’ असा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी ‘प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य मी वाचले आहे. मी बोलतो त्याचा आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध आहे, हे पवार साहेबांनी समजून सांगावे. प्रबोधनकारांचे नाव सोयीने घेऊ नका. प्रबोधनकारांचे विचार कोणालाही झेपणारे नाहीत,’ असा पलटवार केला होता.

Source link

raj thackeray and sharad pawarraj thackeray latest newsraj thackeray on ncprohit pawar latest newsshrad pawarराज ठाकरे
Comments (0)
Add Comment