रक्षाबंधनासाठी गिफ्ट द्यायचं आहे? ३००० च्या बजेटमध्ये खरेदी करा शाओमीचे बेस्ट गॅजेट्स, पाहा यादी

Xiaomi Beard Trimmer 2C

Xiaomi Beard Trimmer 2C मध्ये फक्त २ तासांच्या क्विक चार्जमध्ये ९० मिनिटांचा रनटाइम मिळतो. हा ट्रिमर ४० लेन्थ मध्ये कटिंग करू शकतो. चार्जिंगसाठी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे तर बॅटरी किती चार्ज आहे हे दाखवण्यासाठी एलईडी इंडिकेटर देखील आहेत.

(सौजन्य: शाओमी इंडिया)

Redmi 10000mAh Power Bank

Redmi 10000mAh Power Bank ची किंमत १,९९९ रुपये आहे, परंतु सेलमध्ये हे १,१९९ रुपयांना विकले जातील. ही पावर बँक १०,०००एमएएचच्या क्षमतेसह येते, जोडीला १०वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ह्यात मायक्रो-यूएसबी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.
(सौजन्य: शाओमी इंडिया)

वाचा : Chandrayaan 3 यशस्वी करत भारताचा चंद्रावर जय हो! गुगलनंही अभिनंदन करत तयार केलं खास Google Doodle​

Xiaomi Smart Speaker

Xiaomi Smart Speaker ची किंमत ५,९९९ रुपये आहे, परंतु सेलमध्ये हे १,९९९ रुपयांमध्ये विकले जात आहेत. हे स्पिकर्स प्ले, पॉज, वॉल्यूम-अप, वॉल्यूम-डाउन, म्यूट, २ माइक, १.५ फुल-रेंज स्पिकर, १२वी/१A, डीसी इनपुट सारख्या फीचर्ससह बाजारात आले आहेत.
(सौजन्य: शाओमी इंडिया)

Redmi Sonicbass 2 Wireless Earphones

Redmi Sonic Bass Wireless Earphones 2 ची किंमत जरी २,९९९ रुपये असली तरी सेलमध्ये ह्यांची विक्री १,२९९ रुपयांमध्ये केली जात आहे. ह्या बड्स मध्ये ९.२ mm dynamic ड्रायव्हर्स, १० मिटर पर्यंत रेंज, १६ तासांपर्यंतचा म्यूजिक प्लेबॅक आणि IPX5 रेटिंग देण्यात आली आहे.

(सौजन्य: शाओमी इंडिया)
वाचा: अरे वाह! Google तुम्हाला वाचवणार हॅकर्सपासून; Dark Web Report म्हणजे काय? जाणून घ्या

Redmi Watch 3 Active

Redmi Watch 3 Active स्मार्टवॉचची किंमत ५,९९९ रुपये आहे, परंतु तुम्ही शाओमीच्या सेल दरम्यान हे २,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फीचर्स पाहता, ह्या वॉचमध्ये १.८३ इंचाचा एचडी डिस्प्ले, ५ एटीएम रेटिंग, कॉल फिचर आणि २८९एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
(सौजन्य: शाओमी इंडिया)

Redmi Buds 4 Active FB

Redmi Buds 4 Active ची मूळ किंमत २,९९९ रुपये आहे, परंतु सेलमध्ये हे १,३९९ रुपयांमध्ये विकत घेता येतील. हे बड्स Air White आणि Bass Black कलर ऑप्शनसह विकत घेता येतील. फीचर्स पाहता ह्यात १२एमएमचे ड्रायव्हर्स, IPX4, Google Fast Pair, ५.३ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि एनवायरमेंटल नॉइज कॅन्सलेशन सारखे फीचर्स मिळतात.
(सौजन्य: शाओमी इंडिया)

वाचा: कोणलाही न कळवता Jio नं बंद केला सर्वात स्वस्त प्लॅन; आता तीस रुपये द्यावे लागणार जास्त

Source link

Raksha BandhanRedmi Buds 4 ActiveXiaomiXiaomi Raksha Bandhan Saleरेडमीशाओमी
Comments (0)
Add Comment