Varad Lakshmi Vrat 2023: वरदलक्ष्मी व्रताचा मुहूर्त, मंत्र आणि आरती

श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा आणि जरा-जिवंतिका पूजन यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत केले जाते. म्हणजेच शुक्रवार, २५ ऑगस्ट २०२३ रोजी हे व्रत आचरावे. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल, अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे, असा सल्ला दिला जातो. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.

वरलदक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त

या दिवशी सिंह लग्न पूजा पहाटे ५.५५ ते ७.४२ पर्यंत असेल. त्यानंतर वृश्चिक लग्न पूजा दुपारी १२.१७ ते २.३६ पर्यंत होईल. कुंभ लग्नाची पूजा संध्याकाळी ६.२२ ते रात्री ७.५० पर्यंत असेल. त्यानंतर रात्री १०.५० ते १२.४५ पर्यंत वृषभ लग्नाची पूजा केली जाईल.

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ ४ राशींसाठी आणेल सोन्यासारखे दिवस, सप्टेंबर ठरेल नफ्याचा

वरदलक्ष्मी व्रतासाठी पूजा मंत्र

“वरलक्ष्मीर्महादेवि सर्वकाम-प्रदायिनी

यन्मया च कृतं देवि परिपूर्णं कुरुष्व तत्”

वरदलक्ष्मी व्रत पूजा पद्धत

वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि स्वच्छ कपडे परिधान करतात. या दिवशी घराचीही व्यवस्थित स्वच्छता करावी. संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडल्याने ते पवित्र होते. घराच्या बाहेर रांगोळी काढावी आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मूर्तींना पंचामृताने स्नान घाला आणि नंतर त्यांना नवीन वस्त्रे परिधान करून सजवा. या दिवशी दिवाळीप्रमाणे लक्ष्मीची पूजा केली जाते. गणेशाचीही पूजा करा. त्यानंतर नैवेद्य दाखवून व आरती करून पूजा पूर्ण करावी.

Varad Lakshmi Vrat 2023: वरदलक्ष्मी व्रत कधी आहे? जाणून घेऊया तिथी महत्व आणि पूजाविधी

वरदलक्ष्मीची आरती

जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते । प्रसन्न होऊनि आतां वर दे आम्हांते।। धृ. ।।
श्रीविष्णुकांते तव विश्वावरि सत्ता । स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीव्रत करितां ।। १ ।।
जननी तुजऐसी या नाही त्रिभुवनीं । सुरवर वंदिती मस्तक ठेवुनि तव चरणी ।। २ ।।
कृपाप्रसादें तुझिया लाभे सुखशांति । चिंताक्लेशहि जाती नुरते आपत्ती ।। ३ ।।
वैभव ऐश्वर्याचें आणि अपार द्रव्याचें । देसी दान दयाळे सदैव सौख्याचे ।। ४ ।।
यास्तव मिलिंदमाधव आरती ओवाळी । प्रेमें भक्तिभावें लोटांगण घाली ।। ५ ।।
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते ।।

Mangala Gauri Katha: मंगळागौरीची कहाणी

Source link

varad lakshmi vrat 2023varad lakshmi vrat aarti in marathivarad lakshmi vrat mantravarad lakshmi vrat shubh muhurtaवरदलक्ष्मी व्रत २०२३वरदलक्ष्मी व्रताचा मंत्र आणि आरती
Comments (0)
Add Comment