कधी सुरू होणार?
समोर येणाऱ्या माहितीनुसार २८ ऑगस्ट २०२३ रोजी Jio Airfiber लाँच केले जाऊ शकते. या दिवशी रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत Jio Airfiber ची घोषणा केली जाऊ शकते असे मानले जात आहे.
Airtel vs Jio
दूरसंचार क्षेत्रात जिओ आणि एअरटेल यांच्यातील स्पर्धा तर सर्वत्रच प्रसिद्ध आहे. स्वस्त व्हॉईस कॉलिंग आणि डेटा प्लाननंतर जिओ एअरफायबर क्षेत्रातही एअरटेलला आव्हान देण्यासाठी सज्ज झालं आहे. काही काळापूर्वी Airtel ने Airtel Extreme Airfiber लाँच केले होते, ज्यांच्या स्पर्धेत Jio ने Jio Air Fiber लाँच केले होते.
एअरटेल एअरफायबरच्या किंमतीचं काय?
एअरटेल एक्सस्ट्रीम एअरफायबर दिल्ली आणि मुंबईमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याची सुरुवातीची मासिक किंमत ७९९ रुपये आहे. अर्धवार्षिक योजना ही ४,४३५ रुपयांची आहे.
जिओ एअरफायबरची अपेक्षित किंमत किती?
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर जिओ आपला एअरफायबर प्लान २० टक्के कमी किमतीत लाँच करू शकतो. अशा परिस्थितीत, त्याची मासिक किंमत सुमारे ६४० रुपये असू शकते. अर्धवार्षिक योजना ३६५० रुपयांमध्ये लाँच केली जाऊ शकते. तसेच, JioCinema सह अनेक अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन Jio देऊ शकते
एअर फायबर नेमकं काय?
डायरेक्ट एअर फायबर हे नवीन तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल फायबरची गरज भासणार नाही. यात एक रिसीव्हर असेल, ज्यामध्ये 5G सिम असेल, ज्याला तुमचे वाय-फाय कनेक्ट केले जाईल. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना 1Gbps पर्यंत वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट सेवा मिळेल.