आता ऑनलाइन मिळणार ९९९ रुपयांच्या 4G Phone; Jio Bharat 4G अ‍ॅमेझॉनवर लिस्ट

Jio Bharat 4G फोन ऑनलाइन देखील विकत घेता येईल. Reliance Jio आणि Karbonn नं मिळून बनवलेला अत्यंत स्वस्त ४जी फोन आता काही क्लिक्समध्ये तुमच्या घरपोच होऊ शकतो. विशेष म्हणजे ऑनलाइन देखील ह्या 4G Feature Phone ची किंमत ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ह्याची उपलब्धता आणि फीचर्स.

Jio Bharat 4G अ‍ॅमेझॉनवर लिस्ट

Jio Bharat 4G फोन ह्याआधी फक्त रिलायन्स डिजिटल स्टोर्स आणि रिलायन्स जिओ संबंधित रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होता. त्यामुळे ज्या ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची सुविधा हवी होती त्यांना हा फोन मिळत नव्हता म्हणून आता कंपनीनं जिओ भारत ४जी Amazon वर लिस्ट केला आहे. अ‍ॅमेझॉनवरील टीजरनुसार हा स्वस्त ४जी फीचर फोन २८ ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून सेलसाठी उपलब्ध होईल. जिओ भारत ४जी फोन फक्त ९९९ रुपयांचा आहे. त्याचबरोबर बँक ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे ह्याची किंमत आणखी कमी होऊ शकते.

वाचा: रक्षाबंधनासाठी गिफ्ट द्यायचं आहे? ३००० च्या बजेटमध्ये खरेदी करा शाओमीचे बेस्ट गॅजेट्स, पाहा यादी

Jio Bharat 4G फोनचे स्पेसिफिकेशन

जिओ भारत ४जी मधील ४जी एलटीई कनेक्टिव्हिटी ही सर्वात मोठी खासियत आहे कारण ती फिचर फोनमध्ये कमी पाहायला मिळते. मनोरंजनासाठी JioCinema, JioSaavn अ‍ॅप्स आणि FM रेडियो देण्यात आलं आहे.

फोनमध्ये T9-स्टाइल कीपॅड देण्यात आला आहे. डिवाइसवर पुढील बाजूस भारत ब्रँडिंग आणि मागे कार्बन ब्रँडचा लोगो आहे. फोनमध्ये १.७७ इंचाचा डिस्प्ले आहे, यात १२८GB पर्यंत एक्सटर्नल मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट आहे.

युजर्सना डिवाइसमध्ये एलईडी फ्लॅशसह ०.३MP (VGA) चा रियर कॅमेरा मिळतो. कंपनीनं चांगल्या बॅकअपसाठी १,०००mAh ची बॅटरी दिली आहे. फीचर फोन असूनही ह्यात तुम्हाला स्मार्टफोनमधील अनेक अ‍ॅप वापरता येतील. तसेच JioPay च्या माध्यमातून UPI वरून व्यवहार देखील करता येतील.

वाचा: कोणलाही न कळवता Jio नं बंद केला सर्वात स्वस्त प्लॅन; आता तीस रुपये द्यावे लागणार जास्त

Jio Bharat 4G रिचार्ज प्लॅन

Jio Bharat 4G फीचर फोनचा वापर करण्यासाठी तुम्हाला १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल. ज्यात २८ दिवस वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, १४जीबी ४जी डेटा आणि जिओ अ‍ॅप्सच सब्सस्क्रिप्शन मिळेल. विशेष म्हणजे फक्त १,२३४ रुपयांमध्ये तुम्ही वर्षभराचा रिचार्ज देखील करू शकता.

Source link

jio bharat 4gjio bharat 4g phone pricejiophonekarbonnजिओजिओफोन
Comments (0)
Add Comment