दिलखेचक मजेंटा रंगात येतोय Moto G84 5G; कंपनीनं लाँच डेटसह फीचर्सही सांगितले

Moto G84 5G ची भारतातील लाँच डेट कंपनीनं अधिकृतपणे सांगितली आहे. फ्लिपकार्टवरील लिस्टिंगनुसार हा फोन पुढील महिन्यात देशात लाँच होईल. तसेच लिस्टिंगमधून महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे. ज्यात डिजाईन, डिस्प्ले, कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरीचा देखील समावेश आहे. आता फक्त किंमत जाणून घेण्यासाठी लाँच डेटची वाट पाहावी लागेल.

Moto G84 5G कधी येणार भारतात?

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर मोटोरोलानं फ्लिपकार्टवरील एक लिंक शेअर केली आहे आणि कमिंग सून लिहण्यात आलं आहे. पंरतु ती लिंक ओपन केल्यावर समजलं की Moto G84 5G स्मार्टफोन येत्या १ सप्टेंबरला भारतात लाँच केला जाणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून भारतात विकला जाईल हे तर स्पष्ट झालं आहे. तसेच फोन मिडनाइट ब्लू, मार्शमॅलो ब्लू आणि व्हिवा मॅजेंटा ह्या तीन आकर्षक रंगात सादर केला जाईल.

वाचा: रक्षाबंधनासाठी गिफ्ट द्यायचं आहे? ३००० च्या बजेटमध्ये खरेदी करा शाओमीचे बेस्ट गॅजेट्स, पाहा यादी

Moto G84 5G चे स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंगनुसार, मोटो जी ८४ ५जीमध्ये ६.५५ इंचाचा पीओएलईडी डिस्प्ले दिला जाईल, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १३०० निट्झ पर्यंतच्या ब्राइटनेसला सपोर्ट करेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात ओआयएस सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ८ मेगापिक्सलचा मॅक्रो+ डेप्थ कॅमेरा सेन्सर मिळेल. सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.

फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिला जाईल. जोडीला १२जीबी रॅम व २५६जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा फोन अँड्रॉइड १३ सह लाँच केला जाईल, जो नंतर अँड्रॉइड १४ वर अपडेट होईल आणि ३ वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील. फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी मिळेल, जी ३०वॉट टर्बो पावर चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याचबरोबर हा फोन ५जी बँड्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पिकर्स, मोटो स्पॅशियल साऊंड आणि आयपी५४ रेटिंग देखील मिळेल.

वाचा: आता ऑनलाइन मिळणार ९९९ रुपयांच्या 4G Phone; Jio Bharat 4G अ‍ॅमेझॉनवर लिस्ट

Moto G84 5G ची किंमत

Moto G84 स्मार्टफोन गेल्यावर्षी आलेल्या मोटो जी८२ चा उत्तराधिकारी असेल, एवढं मात्र नक्की. कंपनीनं नव्या फोनची किंमत मात्र सांगितली नाही परंतु असा अंदाज लावला जात आहे की नवीन फोन देखील जुन्या फोन प्रमाणे २१,४९९ रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Source link

moto g84 5gmoto g84 5g priceMotorolaमोटो जी८४ ५जीमोटोरोला
Comments (0)
Add Comment