narayan rane vs neeam gorhe: नारायण राणेंचे वर्तन दुतोंडी सापासारखे; नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

हायलाइट्स:

  • नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र.
  • नारायण राणे यांचे वागणे दुतोंडी सापासारखे आहे- नीलम गोऱ्हे.
  • मुंबई आणि कोकणातील जनता शिवसेनेवर प्रेम करते- नीलम गोऱ्हे.

मुंबई: नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Raneआणि शिवसेनेतील वाकयुद्ध अधिकच वाढत असून आता शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एकीकडे बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त करायचा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंविषयी गरळ ओकायची, असे हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात गोऱ्हे यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला.

गोऱ्हे म्हणाल्या की, एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सातत्याने गरळ ओकायची, असे नारायण राणे यांचे सुरू आहे, अशी टीका करतानाच यांचे हे वर्तन दुतोंडी सापासारखे आहे, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीकास्त्र सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरे पुढील महिन्यात पुन्हा पुणे दौऱ्यावर, मेळाव्याचे करणार आयोजन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेचे प्रहार करताना नीलम गोऱ्हे यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टिप्पणी आहे. देवेंद्र फडणवीस हे नारायण राणे यांच्या मागे फरफटत जात आहेत. या फरफटत जाण्याचा अर्थ काय आहे हे त्यांच्या काही दिवसांमध्ये लक्षात येईलच. फडणीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे, असे सांगतनाच आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा जोरदार टोलाही त्यांनी राणे यांना लगावला.

क्लिक करा आणि वाचा- राहुल गांधींवर टीका करताना दानवेंची जीभ घसरली; आघाडीचे नेते भडकले

नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडताना नीलम गोऱ्हे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मुद्द्यालाही हात घातला. त्या म्हणाल्या की, मुंबई महापालिकेच्या नाटकाचा प्रयोग चार वेळा झालेला आहे. यातून मुंबई आणि कोकणातील लोकांचे प्रेम शिवसेनेवर किती आहे हे दिसले आहे. कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने लोकांची सेवा केली आहे आणि की कोणीही नाकारू शकणार नाही, असे नमूद करतानाच मंत्रिपद मिळाले म्हणून सतत बोलत राहायचे आणि लोकांची दिशाभूल करायची इतकाच त्यांचा अजेंडा आहे. मराठीत म्हण आहे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे, अगदी तशा पद्धतीचेच त्यांचे बोलणं आहे, अशी टीकाही त्यांनी राणे यांच्यावर केली.

क्लिक करा आणि वाचा- भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक, शाईही फेकली

Source link

Narayan Raneneelam gorheकेंद्रीय मंत्री नारायण राणेनारायण राणेनारायण राणे विरुद्ध शिवसेनानीलम गोऱ्हेविधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे
Comments (0)
Add Comment