आता महाविद्यालयात दिले जाणार पर्सनालिटी डेव्हलपमेंटचे धडे.. असा असेल अभ्यासक्रम..

आपण पैशाने किती मोठे झालो यापेक्षा माणूस म्हणून किती मोठे झालो याला समाजात आजही खूप महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे मुलांच्या कळत्या वयातच त्यांच्यावर संस्कार होणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे हे फार गरजेचे आहे. त्यांना भविष्यात बऱ्या- वाईटाची जाणीव हवी, योग्य त्या ठिकाणीय योग्य ती कृती करण्याची समज व्हावी यासाठी त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे आवश्यक असते.

बऱ्याचदा शालेय जीवनात आणि नंतर अनुभवातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. पण आता याची गरज ओळखून युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commision) ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संस्थांना दिल्या आहेत. ‘जीवन कौशल्य २.०’ असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे.

त्यामुळे आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतानाच मानवी जीवन मूल्ये, नेतृत्व कसे करावे, व्यवस्थापन कौशल्य, प्रभावी संवादशैली, व्यावसायिक कौशल्ये याचे शिक्षण मिळणार आहे. शिक्षणासोबत विद्याथी माणूस म्हणून घडले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे या उद्देशाने हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. लवकरच हा अभ्यासक्रम देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांत पदवीपूर्व स्तरावर सुरु होईल. हा अभ्यासक्रम सर्व विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना पर्यायी विषय म्हणून निवडता येणार आहे.

(वाचा: Job Tips For Promotion: नोकरी करताय पण प्रमोशन मिळत नाहीय? मग ‘या’ पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा..)

या अभ्यासक्रमाबाबत ‘एनइपी’ (National Education Policy 2020) म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही शिफारस करण्यात आली आहे. २०१९ मध्येच हा ‘जीवन कौशल्य’ हा अभ्यासक्रम विकसित केला होता. परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्यात काही बदल करण्यात आले आहेत. आता हा अभ्यासक्रम आणि मार्गदर्शक सूचना आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत ज्यामध्ये डिजिटल साक्षरता, सोशल मीडिया, डिजिटल नैतिकता, वैयक्तिक अर्थ व्यवस्थापन, घटनात्मक मूल्ये, न्याय आणि मानवी हक्क अशा घटक विषयांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे.

‘जीवनकौशल्य २.०’ या अभ्यासक्रमातील चार प्रमुख घटक

  • संवाद कौशल्ये
  • व्यावसायिक कौशल्ये
  • नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये
  • वैश्विक मानवी मूल्ये

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • अभ्यासक्रम चार प्रमुख भागात विभागलेला असेल.
  • प्रत्येक भागाला दोन श्रेयांक आणि संपूर्ण अभ्यासक्रमाला आठ श्रेयांक असतील.
  • चार प्रमुख भागांची विभागणी ३३ पाठांमध्ये असेल.
  • मूलभूत जीवन कौशल्य शिकविण्यावर असेल भर असेल.

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

Source link

Career Newscollege newseducation newspersonality developmentpersonality development coursepersonality development tipsstudent guidanceugc decesionugc newsuniversity news
Comments (0)
Add Comment