परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार; एकलव्यच्या माध्यमातून देशभरातील शंभरहून अधिक वियर्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

Foreign Education Workshop: भारतात वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य संस्थे’च्या माध्यमातून आता मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत असून, अशाच वंचित घटकातून उच्च शिक्षण पूर्ण केलेले मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना ‘एकलव्य’ ही संस्था मार्गदर्शन करत असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे, ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ हा प्रोग्राम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक आणि पहिल्या पिढीतील शिक्षण घेत असलेले व्यक्ती असणार्‍या राजू केंद्रे यांना दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. यामुळे त्यांना लंडन येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या परदेशी शिक्षणासारखीच संधी अनेकांना मिळावी म्हणून त्यांनी ‘ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ एकलव्यची सुरुवात केली होती. एकलव्य अंतर्गत अशा कार्यक्रमातून येत्या दहा वर्षात किमान हजार विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा त्यांचा मानस आहे.

(वाचा : Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेताय..? त्याआधी हे नक्की वाचा)

मागील वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या संस्थेने ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ची सुरुवात केली. हा प्रोग्राम तळागाळातील उपेक्षित समूहाच्या, पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, यु.के. आणि युरोपात, मानविक आणि सामाजिक विज्ञान, मीडिया आणि कायदा अशा विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पी.एच.डी मार्गदर्शनासाठी सुरु केला गेला. पुढील काही वर्षांमध्ये अमेरिका आणि इतर देशांमधल्या अर्जांच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा एकलव्य विस्तार करणार आहे.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती)

एकलव्य ग्लोबल स्कॉलर्सच्या पहिल्या वर्षीची एकूण ५० विद्यार्थ्यांना जगभरातील विविध नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असून, त्यांपैकी एकूण १२ विद्यार्थ्यांना ५ करोड रुपयांच्या स्कॉलरशिप्स मिळाल्या आहेत, ज्यामर्फत ते आपले शिक्षण मोफत पूर्ण करू शकणार आहेत.

नागपूर येथे होणाऱ्या बूटकॅम्पमध्ये ऑनलाइन कार्यशाळा आणि अनेक चर्चासत्रे यांच्या सहाय्याने परदेशातील अनेक विद्यापीठे आणि स्कॉलरशिपसाठी लागणाऱ्या अर्जाचे मार्गदर्शन, IELTS प्रशिक्षण, स्टेटमेंट ऑफ पर्पजचे लेखन (SOP), लेटर्स ऑफ रिकमेंडेशन (ROI) , व्हिजा सुविधा (Visa) या सगळ्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.

२५ ते २७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत नागपूरच्या अशोकवन येथे आयोजित करण्यात आलेल्या निवासी शिबिरात साठहून अधिक विद्यार्थी आणि ८ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. या शिबिरात चेवेनिंग स्कॉलरशिप नंतरच्या ज्या जागतिक पातळीवरील संधी म्हणजेच कॉमनवेल्थ, इरासमस यांबद्दल तसेच इतर संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यंदा, सुमित सामोस (ऑक्सफर्ड विद्यापीठ), वैभव सोनोणे (कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलर), राजू सरकार (नॅशनल ओवरसीज स्कॉलरशिप), पूजा म्हसके (नॅशनल ओवरसीज स्कॉलरशिप), स्नेहल तनपुरे, निखिल बिलवे, सचिन कामल, सौरभ हटकर, अझहर नदाफ, एकनाथ वाघ, गुंजाली स आणि रॉयल सोसायटी फेलो राजू केंद्रे हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.

टीप: ही कार्यशाळा सुरुवातीपासून ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅमचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. ज्यांना इच्छा असेल आणि जे मार्गदर्शनाच्या शोधात आहेत असे विद्यार्थी पुढील शिबिरासाठी अर्ज करू शकतात.

(वाचा : Education or Personal Loan: एज्युकेशन लोन की पर्सनल लोन काय ठरते शिक्षणासाठी योग्य, विद्यार्थ्यांना हे माहीत असणे गरजेचे)

Source link

eklavyaEklavya Global Scholarseklavya raju kendreforeign educationForeign Education WorkshopFree Foreign Education Workshopielts exam
Comments (0)
Add Comment