Gizmochina च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये CNMO पब्लिकेशनच्या हवाल्याने माहिती देण्यात आली आहे की चीनी कंपनी Meizu नं Smart Glass साठी पेटंट अप्लाय केला आहे. हा स्मार्ट ग्लास स्मार्ट वॉच किंवा बँड प्रमाणे हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल (SpO2) मोजण्यास युजर्सची मदत करेल.
वाचा: एखाद्याचं WhatsApp Status डाऊनलोड करायचंय? अगदी सोप्या आहेत स्टेप्स
हेल्थ सेन्सर्स
रिपोर्टनुसार , ह्या पेटंट डॉक्यूमेंट्समधून डिवाइसच्या अनेक कॉम्पोनेंट्सची माहिती समोर आली आहे. ह्या वियरेबल डिवाइसमध्ये नोज पॅड, हेल्थ मॉनिटरिंग सेन्सर्स इत्यादींचा समावेश असेल. ह्या स्मार्ट ग्लासची सर्वात मोठी खासियत ह्यातील हेल्थ मॉनिटरिंग फीचर असतिल, जे तुमचा हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटर करतील. हे सेन्सर्स नोज बड्सकडे ठेवले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
विशेष म्हणजे Meizu कंपनीनं हा ग्लास पेटंटसाठी स्वतःहून थेट अप्लाय केला नाही. ह्यासाठी एका नवीन कंपनीसह हात मिळवणी केली आहे. ह्या कंपनीचे नाव Hubei Xingji Meizu Technology Co., Ltd आहे, जी साल २०२१ मध्ये सुरु करण्यात आली आहे. ह्या दोन्ही कंपन्यांचे चेयरमन एकच आहेत. Hubei Xingji Meizu Technology Co., Ltd कंपनी बद्दल सांगायचं झालं तर ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट व सॅटेलाइट मोबाइल फोन्स बनवते.
वाचा: रक्षाबंधनासाठी गिफ्ट द्यायचं आहे? ३००० च्या बजेटमध्ये खरेदी करा शाओमीचे बेस्ट गॅजेट्स, पाहा यादी
फोल्डेबल फोनवर देखील काम सुरू
स्मार्ट ग्लास व्यतिरिक्त ही कंपनी फोल्डेबल फोनवर देखील काम करत आहे. काही दिवसांपूर्वी ह्या फोल्डेबल फोनचं पेटंट देखील समोर आलं होतं. ह्या पेटंटच्या माध्यमातून फोल्डेबल फोनची डिजाइन दिसली होती.