नवी दिल्ली : WhatsApp Update : काही काळापूर्वी व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सना एचडी क्वॉलिटीत फोटो शेअर करण्याचे फीचर देण्यात आले आहे. युजर्सना टप्प्याटप्प्याने हे अपडेट मिळत असून या फीचरची माहिती मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीच दिली बोती. आता यानंतर एक नवीन फीचर WhatsApp वर येत असून आता लवकरच लोकांना एचडी व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. हळूहळू हे फीचर देखील लाइव्ह होऊ लागले आहे. 9to5Mac च्या रिपोर्टनुसार, काही लोकांना HD व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय मिळू लागला आहे. या फीचरशी संबंधित नवीन माहिती समोर येत असून दोन पर्यायांनी व्हिडिओ शेअर होऊ शकणार आहेत.
वाचा दोन्ही पर्यांयाबद्दल सविस्तर
अपडेटनंतर, अॅपमध्ये व्हिडिओ शेअर करताना, तुम्हाला २ पर्याय मिळतील ज्यामध्ये एक नॉर्मल क्वॉलिटी असेल आणि दुसरा एचडी क्वॉलिटीचा पर्याय असेल. तुम्ही तुमच्यानुसार कोणताही पर्याय निवडू शकता. तुम्ही HD पर्याय निवडल्यास, लक्षात ठेवा की तुमचे इंटरनेट सामान्यपेक्षा जास्त वेळ घेईल. त्यामुळे आवश्यकतेनुसार पर्यायांमध्ये स्विच करा. नॉर्मल क्वॉलिटी निवडल्यावर, WhatsApp व्हिडिओवर प्रक्रिया करते आणि 480p रिझोल्यूशनमध्ये व्हिडीओ पाठवते. तुमचे इंटरनेट कनेक्शन कमी असताना हा पर्याय निवडणे फायदेशीर ठरते. एचडी पर्यायामध्ये, कंपनी 720p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ पाठवते जे अद्याप 1080p किंवा 4K पेक्षा खूपच कमी आहे.

वाचा :एखाद्याचं WhatsApp Status डाऊनलोड करायचंय? अगदी सोप्या आहेत स्टेप्स
WhatsApp नं आणलं नवीन फीचर
व्हॉट्सअॅपने आणखी एक नवीन एडिट मीडिया कॅप्शन हे फीचर आणले आहे . जे युजर्सना मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत टायपिंगच्या चुका दुरुस्त करण्यास मदत करते. हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सना अॅपचे अपडेटेड व्हर्जन इन्स्टॉल करावे लागेल. हे फीचर Android, iOS आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
वाचा : iPhone 15 चा लाँचिंग इव्हेंट १५ सप्टेंबरला? समोर आली महत्त्वाची माहिती