रियलमी जीटी ५ ची डिजाइन
चिनी मायक्रो ब्लॉगिंग साईट विबोच्या माध्यमातून रियलमीनं आपल्या आगामी रियलमी जीटी ५ च्या डिजाइनचा खुलासा केला आहे. हँडसेटचा बॅक पॅनल ‘मिरॅकल ग्लास’ पासून बनवण्यात येईल, असं लिहिण्यात आलं आहे. जो लिक्विड मेटलचा अनुभव देईल असा दावा देखील कंपनीनं केला आहे. फ्रंट आणि बॅक पॅनल कर्व एजसह दिसत आहेत. कॅमेरा मोड्यूल बॅक पॅनलच्या वरच्या बाजूला थोडा वर आला आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनी फ्लोविंग सिल्व्हर मिरर म्हणत आहे.
वाचा: फोन चार्ज करणं जीवावर बेतलं; एका छोट्या चुकीमुळे ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
रियलमी जीटी ५ च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. ज्यात डावीकडे व्हर्टिकली दोन वर्तुळाकार आहेत. बाजूला एलईडी फ्लॅश लाइट युनिट आहेत, जोडीला एक छोट्या एलईडी लाइट्सची सीरिज आहे, ज्यात स्नॅपड्रॅगनचा लोगो दिसत आहे. तर फ्रंटला कर्व पॅनलमध्ये वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल देण्यात आला आहे.
रियलमी जीटी ५च्या कर्व एज डिस्प्लेमध्ये १.४६ मीमी एवढे अल्ट्रा नॅरो बेझल मिळतील. फोन देखील आधीपेक्षा जास्त स्लिम वाटत आहे. खालच्या बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक मायक्रोफोन आणि स्पीकर ग्रील दिसत आहे.
वाचा: सायलंट मोडवर असलेला अँड्रॉइड फोनही शोधता येईल, फक्त ‘हे’ फिचर वापरा
रियलमी जीटी ५ चे स्पेसिफिकेशन
Realme GT 5 मध्ये प्रो-एक्सडीआर डायनॅमिक डिस्प्ले दिला जाईल, ज्यात १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट, २००० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, १.५के रिजोल्यूशन आणि २१६० हर्ट्झ पर्यंत पीडब्लूएम डीमींग मिळेल. रियलमी जीटीमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट, २४जीबी रॅम आणि २४० वॉट फास्ट चार्जिंग, मिळेल हे खूप आधीच कंफर्म झालं आहे.