राज्याच्या जलसंपदा विभागात भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

राज्यातील जलसंपदा विभाग हा पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही या विभागाचे काम व्यापक स्वरूपात चालते. पाणी वितरणाचे काम करणाऱ्या या जलसंपदा विभागात काही रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत नुकतीच अधिसूचना आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भरती जाहिर करण्यात आली असून या भरती अंतर्गतकनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. एकूण ५ रिक्त पदांसाठी हि भरती होणार असून https://wrd.maharashtra.gov.in/ जलसंपदा विभागाच्या या अधिकृत साईट वर जाऊन तुम्ही भरती संदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. या भरतीसाथीचे अर्ज ५ सप्टेंबर पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत.

भरती संबंधित अधिक आणि सविस्तर माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1DRmByO54JhJsaQjJ500YVjANcEGJq90Y/view या लिंकवरील मजकूर काळजीपूर्वक वाचा. आता या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊया..

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती २०२३ मधील रिक्त पदे व संख्या
पदे – कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता.
एकूण रिक्त पदे – ५

अर्जाची पद्धत : ऑफलाईन.

शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहा.अभि. श्रेणी २ (स्थापत्य) संवर्गातील पदावर कमीत कमी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

भरती प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

अर्ज प्रत्यक्ष मिळण्याचा आणि पाठविण्याचा पत्ता

  • कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण, उंबर्डे फाटा, गजानन महाराज मंदिराजवळ, रामवाडी पेण, जि. रायगड.
  • कार्यकारी अभियंता, द.र. खारभूमी विकास विभाग, रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
  • कार्यकारी अभियंता, सिंधुदूर्ग खारभूमी विकास विभाग, सिंधुदुर्गनगरी, जि. सिंधुदूर्ग.

(वाचा: Job Tips For Promotion: नोकरी करताय पण प्रमोशन मिळत नाहीय? मग ‘या’ पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा..)

Source link

Career Newscareer news marathiGovernment jobjalsampada departmentjob for engineersJob NewsWater Resources Departmentwater resources department maharashtraWRD Recruitment 2023
Comments (0)
Add Comment