ऐन परीक्षेत तब्येत बिघडूनही मानली नाही हार, ‘सीएस’ परीक्षेत प्रथम आलेल्या राशीची यशोगाथा..

देशातील कठीण परीक्षांपैकी असणाऱ्या ‘सीएस’ म्हणजे ‘कंपनी क्रेटरीज’ (Company Secretary) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. तेव्हापासून या परीक्षेच्या निकालाची बरीच चर्चा रंगली आहे, कारण या परीक्षेत महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील राशी पारख देशात पहिली आली आहे. तिचे लहे यश अनन्यसाधारण आहे, कारण राशीने या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. अगदी तिची प्रकृती बिघडलेली असतानाही तिने माघार घेतली नाही. म्हणूनच थोडक्यात तिच्या यशाचा प्रवास पाहूया…

‘आयसीएसआय’ म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI) जून २०२३ मध्ये घेतलेल्या सीएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यातील व्यावसायिक परीक्षेत (प्रोफेशनल प्रोग्राम) इचलकरंजी येथील राशी अमृत पारख हिने ९०० पैकी ५५३ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

(वाचा: Job Tips For Promotion: नोकरी करताय पण प्रमोशन मिळत नाहीय? मग ‘या’ पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा..)

राशी सध्या बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला आहे. राशीने आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन या परीक्षेची तयारी केली होती. कारण राशीचे वडील अमृत पारख देखील सीएस आहे. वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यामुळे ती हे यश प्राप्त करू शकली. या परीक्षेसाठी दिवसातून ८ ते १० तास ती अभ्यास करत होती. या सातत्या मुळेच आज देशात ती पहिली आली आहे.

राशीचे शालेय शिक्षण इचलकरंजीतील न्यू मिलिनिअम पब्लिक स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण श्रद्धा ज्युनिअर कॉलेजमधून झाले. सध्या ती इचलकरंजीच्या व्यंकटेश महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे. राशीसाठी हि परीक्षा देणे सोपे नव्हते. कारण परीक्षे दरम्यान मानसिक ताण आल्याने ऐन परीक्षेच्या काळातच तिची तब्येत बिघडली होती. पण काहीही झाले तरी परीक्षा द्यायचीच ही तिची जिद्द होती. आणि त्याच जिद्दीच्या जोरावर आज तिने हे यश मिळवले आहे.

या यशाबद्दल राशी म्हणते…

माझ्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा होता म्हणून मी ही परीक्षा देऊ शकले. यामध्ये माझ्या शिक्षकांचाही मोठा वाटा आहे. यासाठी मी दररोज सात ते दहा तास अभ्यास करत होते. अभ्यास करताना सातत्य आणि स्वतःच्या नोट्स काढणे यावर मी भर दिला. यासाठी खूप सर्व करावा लागला. आता सीएस म्हणून काम करताना कायद्याचा देखील अभ्यास असावा लागतो म्हणून आता मी तीन वर्षांच्या ‘लाॅ’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.
(फोटो सौजन्य: Linkedin)

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

Source link

Career Newscs exam resultcs exam toppercs examseducation newsJob NewsKolhapur newsrashi parakhSangli news
Comments (0)
Add Comment