हायलाइट्स:
- मित्राच्याच सात वर्षाच्या मुलाचा बळी घेणाऱ्या खुन्याला फाशी द्या- ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा.
- दोन दिवसापासून नरबळीचा संशय व्यक्त होत असताना अजूनही खरे कारण अस्पष्ट.
- या मुळे या प्रकरणाचागुंता वाढत चालला आहे.
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर
मित्राच्या घरात त्याने श्रावणातला उपवास सोडला, दुसऱ्या दिवशी वास्तुशांतीचं गोड जेवणही घेतलं आणि त्याच दिवशी त्याने मैत्रीचा घात केला. मित्राच्याच सात वर्षाच्या मुलाचा बळी घेणाऱ्या खुन्याला फाशी द्या म्हणत ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. दोन दिवसापासून नरबळीचा संशय व्यक्त होत असताना अजूनही खरे कारण स्पष्ट न झाल्याने गुंता वाढत निघाला आहे. (The cause of death of the boy who was found dead in the lake is still unclear)
कागल तालुक्यातील सोनाळी या गावातील वरद रवींद्र पाटील याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले होते. हा खून रवींद्र पाटील यांचा मित्र असलेल्या दत्तात्रय मारूती वैद्य याने केल्याचे तपासात पुढे आले. खून केल्याची कबुली त्याने दिली असली तरी कारण मात्र अजूनही तो सांगत नाही. वैद्य याचे पंधरा वर्षापूर्वी लग्न झाले आहे. अजूनही त्याला मुल होत नसल्याने त्याने नरबळी म्हणून वरदचा बळी दिल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. शनिवारी सोनाळी व सावर्डे बु. येथील पाच हजारावर ग्रामस्थांनी मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. खुन्याला फाशी द्या, वरदला न्याय द्या अशा मागण्या करत महिलांनी पोलिस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.
क्लिक करा आणि वाचा- नारायण राणेंचे वर्तन दुतोंडी सापासारखे; नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र
सोनाळी आणि सावर्डे या दोन्ही गावात शनिवारीही तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पोलिस फाटा तैनात आहे. शनिवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे व पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी गावाला भेट दिली. आरोपी सापडला आहे, त्याला जास्तीतजास्त शिक्षा होईल या पद्धतीने तपास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘इथे’ वाढतोय वन्यजीव-मानव संघर्ष; ठोस उपाययोजना करण्याचे सरकारचे निर्देश
आरोपी वैद्य व मृत बालकाचे वडिल रवींद्र हे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. गेले अनेक वर्षे दोन्ही कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. १६ ऑगस्टला वैदय कुटुंबियांनी श्रावणाचा उपवास पाटील यांच्या घरी सोडला. त्यांना पेहरावही केला. १७ ऑगस्टला वरदच्या आजोबांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. तेथेही वैद्य कुटुंबिय उपस्थित होते. सायंकाळी वरदला बाहेर फिरायला नेऊन त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. खून केल्यानंतर चार दिवस वरदचा शोध सुरू होता. या शोध मोहिमेतही आरोपी सहभागी होता. पण खुनाचे कारण अजूनही त्याने सांगितले नाही. यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत निघाला आहे. दोन्ही गावासह तालुक्यात संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत. दोन्ही गावातील व्यवहार दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आले होते
क्लिक करा आणि वाचा- अभिमानास्पद! सोलापूरच्या ‘या’ कन्येची मिस इंडिया स्पर्धेत धडक