युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..

प्रशासकीय कामांमध्ये जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ‘युआयआयसी’ लिमिटेड (UIIC) म्हणजेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीने भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या अंतर्गत ‘प्रशासकीय अधिकारी’ या पदांच्या १०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तेव्हा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करावा असे आवाहन कंपनीने केले आहे.

या भरती प्रक्रियेतून निवडले गेलेले ‘प्रशासकीय अधिकरी’ हे विविध विभागांसाठी काम करणार आहे. त्या प्रत्येक विभागाला काही पदसंख्या राखीव ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी ऑनलाईन माध्यमातून हा अर्ज करायचा आहे. https://uiic.co.in/ हे ‘युआयआयसी’ चे अधिकृत संकेतस्थळ आहे. ज्यावर जाऊन तुम्हाला अर्ज भरता येईल.

भरती संबंधित सर्व तपशील जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1w4da7c6foND_GTCymgqU2vyt2xIb3A_n/view या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जाहिरात पाहता येईल. तर १४ सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ मधील पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी – १०० जागा

(वाचा: Job Tips For Promotion: नोकरी करताय पण प्रमोशन मिळत नाहीय? मग ‘या’ पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा..)

भरती प्रक्रियेतील १०० जागांची विभागवार मांडणी पुढीलप्रमाणे…

पदाचे नाव व रिक्त पदे
लीगल स्पेशलिस्ट – २५
अकाउंट्स/ फायनान्स स्पेशलिस्ट – २४
कंपनी सेक्रेटरी – ३
ऍक्च्युअरी – ३
डॉक्टर- २०
इंजिनिअर – २२
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट – ३
एकूण रिक्त पदसंख्या – १००

शैक्षणिक पात्रता

(भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार आवश्यक असेल्या पदवीमध्ये ६० टक्के गुण असणे बंधनकारक आहे. )

  • लीगल स्पेशलिस्ट : विधी अभ्यासक्रमात पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव.
  • अकाउंट्स/ फायनान्स स्पेशलिस्ट : ICAI/ ICWA किंवा B.Com. किंवा M.Com पदवी
  • कंपनी सेक्रेटरी : पदवीधर आणि इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.
  • ऍक्च्युअरी : सांख्यिकी/ गणित/ एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
  • डॉक्टर : MBBS/ BAMS/ BHMS.
  • इंजिनिअर : सिव्हिल/ ऑटोमोबाईल /मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ ECE/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इन्फॉर्मेशन सायन्स विषयात B.Tech/ B.E/ M.Tech/ M.E.
  • ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट : कृषी पदवी/ पदव्युत्तर पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

वयोमर्यादा
खुला प्रवर्ग : २१ ते ३० वर्षे.
ओबीसी प्रवर्ग : कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय प्रवर्ग : कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट.

भरतीसाठी अर्जाचे शुल्क
खुला आणि ओबीसी प्रवर्ग : १००० रुपये.
मागासवर्गीय/ पीडब्ल्यूडी : २५० रुपये.

(वाचा: Career Tips For School Student: शाळकरी विद्यार्थ्यांना ‘या’ सवयी आवर्जून लावा, करिअर मध्ये होईल फायदाच फायदा..)

Source link

administrative officeradministrative officer jobsCareer NewsJob Newsuiicuiic recruitmentuiic recruitment 2023united india insurance company
Comments (0)
Add Comment