या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहेत. शिवाय, अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मुख्य जाहीरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(फोटो सौजन्य : AICTS Pune अधिकृत वेबसाइट)
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ५
1. पर्यवेक्षक प्रशासन – १ पद
2. लेखा लिपिक – १ पद
3. आया – १ पद
4. हाऊस किपिंग – २ पदे
संस्था : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस, पुणे
नोकरीचे ठिकाण : पुणे
(वाचा : MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखातीमधून पार पडणार निवड प्रक्रिया)
अर्जाविषयी :
अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाइन – ई-मेलच्या माध्यमातून
या ई-मेलवर कर अर्ज : appsmhctcpune@mail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ सप्टेंबर 2023
वयोमार्यादा आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता :
वयोमार्यादा : ४० ते ५० वर्षे (अधिक महितीसाठी AICTS च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात पाहा)
शैक्षणिक पात्रता :
पर्यवेक्षक प्रशासन : पदवीधर
लेखा लिपिक : पदवीधर
आया : आठवी पास
हाऊस किपिंग : आठवी पास
(वाचा : Northern Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये इंजिनिअर्सना नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस)
मिळणार एवढा पगार :
1. पर्यवेक्षक प्रशासन : १६ हजार रुपये प्रतिमाह
2. लेखा लिपिक : १५ हजार रुपये प्रतिमाह
3. आया :९ हजार रुपये प्रतिमाह
4. हाऊस किपिंग : ९ हजार रुपये प्रतिमाह
असा करा अर्ज :
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या.
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- विहित तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
(वाचा : MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती)