चष्म्याच्या कॅमेऱ्यातून करता येणार Instagram लाइव्ह स्ट्रीम; Meta घेऊन येत आहे हटके स्मार्ट ग्लास

Meta सनग्लास मेकर Ray-Ban सह मिळून गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या सेकंड-जनरेशन स्मार्ट ग्लासवर काम करत आहे. ह्या अपकमिंग स्मार्ट ग्लास संबंधित आतापर्यंत अनेक लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत, त्यातून चष्म्याच्या स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. आता आणखी एक रिपोर्ट आला आहे त्यात मेटाच्या स्मार्ट ग्लासच्या स्पेशल फीचरची माहिती आली आहे. कंपनीनं साल २०२१ मध्ये पहिल्या जनरेशनचे Meta Ray-Ban Stories स्मार्ट ग्लास सादर केले होते.

युजर्स करू शकतील लाइव्ह स्ट्रीम

Lowpass च्या रिपोर्टनुसार, Meta आणि Ray-Ban नं बनवलेल्या स्मार्ट ग्लासमध्ये लाइव्ह व्हिडीओ फंक्शन मिळेल, ज्याच्या माध्यमातून युजर्स कुठूनही Instagram वर लाइव्ह स्ट्रीम करू शकतील. त्यामुळे व्यूअर्सना चांगला व्यू मिळेल. ह्या स्मार्ट ग्लासमध्ये माइक आणि स्पिकर देखील असतील, ज्यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान क्रिएटर्स व्यूअर्स सोबत बोलू शकतील. स्मार्ट ग्लास मध्ये AI टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

वाचा: ताप आलाय की नाही ते सांगणार छोटीशी अंगठी; Boat Smart Ring घेणार स्मार्टवॉच जागा

आधी आलेल्या लीक्सनुसार, आगामी स्मार्ट ग्लासमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेल्या सेन्सरसह दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. त्याचबरोरब चष्म्यात फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळू शकतो. जुन्या स्मार्ट ग्लास वजनदार आहे. ह्यात LED इंडिकेटरसह दमदार बॅटरी दिली आहे. यात फोन कॉलच्या माध्यमातून कम्युनिकेट करता येतं. ह्याची याची किंमत प्रीमियम रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे.

यावर्षी होऊ शकतो लाँच

मेटानं आतापर्यंत सेकंड जनरेशनच्या स्मार्ट ग्लासच्या लाँच बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, परंतु लीक्समध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्ट ग्लास यंदा ऑक्टोबरमध्ये Quest 3 मिक्स्ड-रियालिटी हेडसेटसह लाँच केले जाऊ शकतात. याची किंमत देखील प्रीमियम सेगमेंटमध्ये ठेवली जाऊ शकते.

वाचा: कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन हवा? इथे पाहा १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे मोबाइल

Meta Quest Pro ची माहिती

मेटानं गेल्यावर्षी २०२२ मध्ये Quest Pro हँडसेट लाँच केला होता. हा हेडसेट स्नॅपड्रॅगन XR2+ सह येतो. ह्यात १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मिळते. चांगल्या व्यूइंगसाठी हेडसेटमध्ये दोन स्क्रीन आहेत. तसेच Quest Pro मध्ये १० हाय-रेंज सेन्सर मिळतात.

Source link

instagrammetameta ray ban smart glassray banSmart Glassमेटास्मार्ट ग्लास
Comments (0)
Add Comment