आज होणार दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा…

जे विद्यार्थी दहावी – बारावीच्या परीक्षेत नापास झाले आहेत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत, ज्यांना आपल्या गुणांच्या श्रेणीत सुधारणा करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ही परीक्षा निकालानंतर काही महिन्यातच घेतली जाते. यंदाची परीक्षा ऑगस्ट महिन्यात झाली होती, ज्याचा निकाल आज जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती.

परीक्षेच्या काळात २० आणि २८ जुलै दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार शासनाने शाळांना सुटी जाहीर केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात २० जुलै रोजी असलेल्या बारावीच्या संबधित विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी आणि दहावीच्या विषयाची परीक्षा २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तसेच २८ जुलै रोजी असलेल्या दहावीच्या विषयाची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा बरीच चर्चेत राहिली होती. आता या परीक्षेचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज, २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे.

(वाचा: CS Exam Topper: ऐन परीक्षेत तब्येत बिघडूनही मानली नाही हार, ‘सीएस’ परीक्षेत प्रथम आलेल्या राशीची यशोगाथा..)

हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणांची गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ:
www.mahresult.nic.in

गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संकेतस्थळ:
दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in
बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

Source link

10th result12th Resulteducation newsexam newsHSC Resultresult news in marathiSSC HSC REXAM RESULTssc resultstate board examssupplementary exam results
Comments (0)
Add Comment