coronavirus in mumbai updates: मुंबईत आज २८१ करोना रुग्ण बरे होऊन गेले घरी; पाहा, अशी आहे ताजी स्थिती!

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण २८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. या बरोबरच आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने घटली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात २५९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३३२ इतकी होती. तर, दिवसभरात २८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज अधिक आहे. काल ही संख्या २२३ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ६ इतकी होती. मात्र, मुंबईतील करोना वाढीचा दर ०.०४ टक्क्यांवर आली आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तो तब्बल २०२३ दिवसांवर पोहोचला आहे. ( mumbai registered 322 new cases in a day with 223 patients recovered and 6 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १९ हजार ६६२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका झाला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता २ हजार ०२३ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! राज्यात आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, मृत्यूही वाढले

मुंबईत आज ३४ हजार ८८३ चाचण्या

मुंबईत आज एकूण ३४ हजार ८८३ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- नारायण राणेंचे वर्तन दुतोंडी सापासारखे; नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – २५९
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २८१
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१९६६२
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २८२५
रुग्ण दुपटीचा कालावधी- २०२३ दिवस
कोविड वाढीचा दर (१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट)- ०.०४ %

क्लिक करा आणि वाचा- मित्राच्याच सात वर्षाच्या मुलाचा घेतला बळी; खरे कारण अजूनही अस्पष्ट

Source link

corona updatescoronavirus in mumbaiCoronavirus latest updatescovid-19करोनाकरोना अपडेटकोविड-१९मुंबईतील करोनाची स्थिती
Comments (0)
Add Comment